शिक्षकांचा भरणार विज्ञानाचा तास
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा

शिक्षकांचा भरणार विज्ञानाचा तास राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे शिक्षकांसाठी कार्यशाळा

पुणे, ता. २ : तुम्ही विज्ञान शिक्षक आहात का? किंवा विज्ञान हा विषय प्रत्यक्ष कृतीतून किंवा विविध प्रतिकृतींचा वापर करून विद्यार्थ्यांना कसा समजावून सांगायचा असा प्रश्न तुम्हाला पडलाय का? अहो, मग राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे आयोजित विज्ञान विषयक कार्यशाळेतून तुम्हाला अशा सर्व प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

राज्यातील शिक्षकांना सहज उपलब्ध असलेल्या सामग्रीतून विज्ञानातील विविध प्रयोग प्रत्यक्ष कृतीतून किंवा विविध प्रतिकृती बनवून त्याचे प्रात्यक्षिक दाखविणे आणि वर्गामध्ये हे उपक्रम करण्यास प्रोत्साहित करणे या हेतूने राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा विज्ञान विभाग आणि अगस्त्या इंटरनॅशनल फाउंडेशन यांच्या वतीने विज्ञान विषयाच्या शिक्षकांची ऑनलाइन कार्यशाळा सोमवारपासून (ता. ३) घेण्यात येणार आहे.

विज्ञान विषयामध्ये विद्यार्थ्यांना आवड निर्माण व्हावी, यासाठी शिक्षकांनी कल्पकतेने आणि प्रात्यक्षिकातून विद्यार्थ्यांना कसे शिकवावे, या विषयी कार्यशाळेत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये राज्यातील इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांना विज्ञान विषयातील निवडक संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून आणि विविध प्रतिकृती वापरून कशा स्पष्ट कराव्यात, याबाबत सांगण्यात येणार आहे. तीन जानेवारीपासून दर सोमवारी इयत्ता सहावी ते आठवीच्या सामान्य विज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी दुपारी तीन ते चार या वेळेत, तर इयत्ता नववी ते दहावीच्या विज्ञान व तंत्रज्ञान विषयाच्या शिक्षकांसाठी दुपारी चार ते सायंकाळी पाच या वेळेत तज्ज्ञ ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करणार असल्याची माहिती परिषदेतर्फे देण्यात आली आहे. या ऑनलाइन कार्यशाळेत उर्वरित शालेय विषयांचे शिक्षक, पालक यांनाही सहभागी होता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com