भारत इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिन
भारत इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिन

भारत इंग्लिश स्कूलमध्ये बालिका दिन

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा करण्यात आला. यावेळी इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनींनी ‘मी सावित्रीबाई फुले बोलते’ या विषयावर नाट्यछटा सादर केल्या. ज्येष्ठ शिक्षिका शैलजा लोखंडे यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट भाषणातून उलगडून दाखविला. प्रशालेच्या प्राचार्य उज्ज्वला पिंगळे, उपमुख्याध्यापिका अंजनी गानू, पर्यवेक्षक उदयकुमार महिंद्रकर, पर्यवेक्षिका पूजा भुरके, शिक्षिका स्वाती चुत्तर, मनिषा हवालदार यांच्यासह अन्य शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना पगार यांनी केले. तर रोहीणी देवरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top