सावित्रीबार्इ फुले यांना विविध संघटनांकडून अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सावित्रीबार्इ फुले यांना 
विविध संघटनांकडून अभिवादन
सावित्रीबार्इ फुले यांना विविध संघटनांकडून अभिवादन

सावित्रीबार्इ फुले यांना विविध संघटनांकडून अभिवादन

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील विविध संघटनांतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच जयंतीच्या निमित्ताने काही कार्यक्रम देखील आयोजित केले होते.

महाराष्ट्र अंनिस शिवाजीनगर शाखा :
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर पुणे शाखेने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या पूर्वदिनी ‘सावित्री उत्सव’ आयोजित केला होता. ‘प्रथा परंपरांना बदलविणारी बंडखोर सावित्री’, ‘साऊ-स्त्रीमुक्तीचे द्वार’, ‘समाजविवेकी सावित्री’ आदी विचारभावना सवित्रीबाईंबद्दल सभागृहातील पाच महिलांनी फलकावर लिहून कार्यक्रमाचे उद्‍घाटन केले. आव्हानात्मक क्षेत्रांत काम करणाऱ्या वैशाली रासकर, (रिक्षाचालक), मेघना सपकाळ (फायर फायटर), पूनम गायकवाड (रिक्षा चालक), रत्नमाला जाधव (पोस्टवूमन), सविता येवलेकर (विद्युत विभाग कर्मचारी), शबनम डफेदार (शिक्षिका व बालरक्षक कार्यकर्त्या) यांचा सत्कार केला.

रिपब्लिकन संघर्ष दल :
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त गंजपेठेतील फुले वाड्यातील महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास संघटनेचे नेते संजयली भिमाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर अध्यक्ष नितीन बालकी, रतन जगताप, शंकर जोग, महिला अध्यक्षा जाहिदा शेख, अनिता हडगुडे, मीना साळवी, कालिंदी नाईकनवरे, सुनीता सोनवणे, वर्षा कोळी, वर्षा ठक्कर, रंजना दिघे, श्वेता निकुंभ, योगिता साळवे, विनायक बंडी यावेळी उपस्थित होते.

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी :
राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी यांच्या हस्ते समताभूमी येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. रत्ना नाईक, अनिता पवार, पामेला पृथ्वी या शिक्षकांचा सत्कार केला. नीता गलांडे, सारिका पारेख, मीना पवार, श्वेता होनराव, भावना पाटील, ज्योती सूर्यवंशी, उषा घोगरे, विद्या ताकवले, सरिता काळे, स्वाती गायकवाड उपस्थित होत्या.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी :
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन केले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्ष संगीता तिवारी, नगरसेविका लता राजगुरू, प्रदेश महिला सरचिटणीस व नगरसेविका वैशाली मराठे, पुणे शहर महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा पूजा आनंद यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रदेश महिला सरचिटणीस स्वाती शिंदे, प्रदेश महिला सचिव शोभना पण्णीकर, सुवर्णा डंबाळे, नंदा ढावरे, बेबी राऊत, सुनीता नेमूर, आरती साठे उपस्थित होत्या.

कसबा ब्लॉक काँग्रेस कमिटी :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रोहित टिळक यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कसबा ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण करपे, उपाध्यक्ष बबलू कोळी यांच्यासह योगेश भोकरे, संजय चव्हाण, गोरख पळसकर, सुरेश कांबळे, धनंजय भिलारे, गणेश जामकर उपस्थित होते.

राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) ः
संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम महाराष्ट्र भारतीय पत्रकार संघांचे अध्यक्ष ॲड. कैलास पठारे-पाटील यांच्या हस्ते सारसबाग येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. संघटनेचे कायदे सल्लागार ॲड. फैयाज शेख, सरचिटणीस मनोहर गाडेकर, अविनाश बहिरट, भारत पवार, सुरेश नांगरे, सिकंदर शेख उपस्थित होते.

कसबा मतदार संघ ब्लॉक काँग्रेस कमिटी :

जयंतीनिमित्त महात्मा फुले वाडा येथे असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास कसबा मतदार संघ ब्लॉक काँग्रेस कमिटीचे ब्लॉक अध्यक्ष प्रवीण करपे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुरेश कांबळे, बबलू कोळी, शोभना पनीकर, गिता तारू,
प्रतिभा शिंदे, अंजली सोलापुरे उपस्थित होते.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी परिवहन विभाग :
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी परिवहन विभागातर्फे सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास जयंतीनिमित्त पुष्पहार अर्पण केला. विभागाच्या उपाध्यक्ष कल्पना उनवणे यांनी पुष्पहार अपर्ण केला. पुणे शहर अध्यक्ष अय्याज खान, राधिका मखाममले, सुभद्रा धमगुंडे, कल्पना पांगसे, कांचन जव्हेरी, मयूर रत्नपारखी उपस्थित होते.


भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा :
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समताभूमी येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या सरचिटणीस सुवर्णा भरेकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सुवर्णा भरेकर, स्वाती रवळे, वैशाली गोताळे, विद्या भागवत, भाग्यश्री बोरकर उपस्थित होत्या.

प्रियदर्शिनी शिक्षण संस्था :
प्रियदर्शिनी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महेश कुंभार, वर्षा कुंभार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.


झोपडपट्टी सुरक्षा दल :
सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पुणे शहर महिला अध्यक्षा सुरेखा भालेराव, पुणे शहर अध्यक्ष महंमद शेख, प्रदिप पवार, सुनील भिसे, काशिनाथ गायकवाड, चंद्रकांत पिंगळे, उज्ज्वला भोसले उपस्थित होते.

जनता दल (धर्मनिरपेक्ष) :
जयंतीनिमित्ताने सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास जनता दल (धर्मनिरपेक्ष) पुणे शहराच्या वतीने पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल सातव यांच्या हस्ते पुष्पहार केला. दलाचे सरचिटणीस दत्ता पाकिरे, अंजुम इनामदार, राजेंद्र नेवसे, जीवन श्रीसुंदर, जॉन्सन कोल्हापुरे, अंबादास कांबळे, सचिन चव्हाण, दिलीप धायगुडे उपस्थित होते.


कार्तिकेयन्स जनसेवा फाउंडेशन :
समता भूमी येथे असलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास कार्तिकेयन्स जनसेवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व प्रभाग क्रमांक १५ भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या उपाध्यक्षा ॲड. मोनिका गावडे-खलाने यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष आनंद सवाणे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. फिरोज तांबोळी, दत्ता जाधव, शैलेंद्र जाधव, इस्तीयाक बागवान, प्रज्वल बनकर, गणेश कांबळे, शंकर नेटके, अतुल जाधव, प्रकाश क्षीरसागर, महेंद्र कांबळे उपस्थित होते.

भाजप झोपडपट्टी आघाडी :
आघाडीचे अध्यक्ष गणेश शेरला व स्वाती शेरला यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. नजीर शेख, बाळासाहेब शेरला, अमित शहा, गौतम बनसोडे, सचिन खंडागळे उपस्थित होते.


विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठान :
प्रतिष्ठानाचे संस्थापक, अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तौसिफ शेख, सदा देवनार, मयूर वेळेकर, तुषार भोसले, पंचशील चौरे, हर्षदा चौरे, मुकेश गायकवाड, अर्चना कांबळे, सचिन शेरखाने उपस्थित होते.


भाजप :
नगरसेविका मनिषा संदीप लडकत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अनिता जैन, मनिषा बनछोड, देविका जाधव, वैष्णवी लडकत, विद्या चव्हाण आणि मनिषा खंडारे उपस्थित होते.


रुग्ण हक्क परिषद :
सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने रुग्ण हक्क परिषदेतर्फे महात्मा फुले वाड्यावर सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. परिषदेचे केंद्रीय सचिव अपर्णा साठे, प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे, उपसचिव गिरीश घाग, संजय जोशी आणि विजय लांडे उपस्थित होते.


महात्मा फुले मंडळ :
मंडळाच्यावतीने सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. नितीन महाजन यांच्या केशव शंखनाद पथकाने शंख वाजवून मानवंदना दिली. मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत, उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर, सचिव कैलास काठे, सहसचिव विजय कोठावळे उपस्थित होते.

अखिल भारतीय माळी समाज प्रबोधन व शिक्षण संस्था :
खासदार अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते अखिल भारतीय माळी शिक्षण संस्थेतर्फे सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. तसेच या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात संस्थेच्या २०२२ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन झाले. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, माजी आमदार दीप्ती चौधरी, संस्थेचे मुख्य विश्वस्त पद्मकांत कुदळे, अध्यक्ष दिलीप राऊत, सरचिटणीस प्रशांत एकतपुरे, विश्वस्त प्रकाश लोंढे, कार्यकारिणी सदस्य भीमराव जैवळ उपस्थित होते.


मनसे महिला आघाडी :
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहराध्यक्ष वनिता वागस्कर यांच्या नेतृत्वाखाली समताभूमी येथील महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. मनसे महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुशीला नेटके, पुणे शहर सचिव पुष्पा कनोजिया, उपशहर प्रमुख अस्मिता शिंदे, उपशहरप्रमुख जयश्री पाथरकर उपस्थित होत्या.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top