एसटीसेवा अद्यापही विस्कळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीसेवा अद्यापही विस्कळीत
एसटीसेवा अद्यापही विस्कळीत

एसटीसेवा अद्यापही विस्कळीत

sakal_logo
By

पुणे, ता. ३ : राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पुणे विभागातील कर्मचाऱ्यांचा संप गेल्या दोन महिन्यांपासून सुरुच आहे. त्यामुळे पुणे विभागातील १३ आगारांपैकी एकूण आठ आगार विभागाला सुरू करता आले आहेत. पश्चिम महाराष्ट्र सोडता, इतर भागात पुणे विभागातून एसटी सुरुच झाली नाही. यावरून एसटीची वाहतूक सेवा अद्यापही विस्कळित असल्याचे दिसून येत आहे.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावे, या मागणीसाठी ८ नोव्हेंबरपासून पुणे विभागातील १३ आगारांतील एसटी कर्मचारी संपावर ठाम आहेत. राज्य सरकारने संप मिटविण्यासाठी अनेक मार्ग काढले. मात्र, सरकाला अद्याप संप मिटविण्यात यश आले नाही. परिवहन मंत्र्यांनी मेस्मा कायद्याचा धाक दाखविला. तसेच, जे कर्मचारी कामावर हजर होतील, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेतली जाईल, असे आवाहन केले होते. याला अल्प प्रतिसाद मिळाला. मात्र, जे कर्मचारी कामावर हजर झाले, त्यांच्या आधारावर एसटीने स्वारगेट, शिवाजी नगर, पिंपरी-चिंचवड, बारामती, दौंड, इंदापूर, भोर, एमआयडीसी या आठ आगारांतून ४० मार्गांवर एसटीची सेवा सुरू केली आहे. या मार्गावरून एसटीला आतापर्यंत केवळ २९ लाख रुपये एवढे उत्पन्न मिळवता आले आहे.

पुण्यातून खानदेश (उत्तर महाराष्ट्र), मराठवाडा, विदर्भ या भागात जाणाऱ्या प्रवाशांना अद्याप लालपरीची प्रतीक्षा आहे. यामार्गावर केवळ खासगी बससेवा सुरू आहे. खासगी बससेवेला प्रवासी कंटाळले असून, एसटी सुरू होण्याची वाट पाहत आहेत. या मार्गावर काही अडचण आल्यास एसटी विभागाला संपर्क साधावा. तसेच, ०२०/२४४४७१५२ या क्रमांकावर चौकशी करावी. या मार्गावरील कोणत्याही मार्गासाठी ऑनलाइन बुकिंग किंवा आगार आरक्षण सेवा सुरू नाही, असे एसटी विभागाने सांगितले.

‘‘कर्मचाऱ्यांअभावी पश्चिम महाराष्ट्र सोडता, इतर मार्गावर एसटी बससेवा सुरू करण्यास मर्यादा येत आहेत. काही दिवसांत मोठ्या संख्येने कर्मचारी कामावर हजर होतील. त्यानुसार गर्दीच्या आणि लांबच्या मार्गावर बससेवा सुरू केली जाईल.’’
- ज्ञानेश्‍वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी विभाग, पुणे

सुरू असलेली बससेवा
बस...संख्या
शिवशाही...६०
शिवनेरी...२५
साधी गाडी...७०
४० मार्गांवर एकूण...१५५

गाड्यांचे वेळापत्रक...
आगार ः मार्ग ः प्रवास भाडे (रुपयांमध्ये) ः बस प्रकार ः वारंवारता
१) शिवाजी नगर ( वाकडेवाडी) ः पुणे स्टेशन-दादर ः ५१५ ः शिवशाही ः सकाळी ६ पासून प्रत्येकी २५ मिनिटांनी

वाकडेवाडी- औरंगाबाद ः ५१५ ः शिवशाही ः सकाळी ६ पासून प्रत्येकी ४५ मिनिटांनी
नाशिक ः ४७५ ः शिवशाही ः सकाळी ६ पासून प्रत्येकी ४५ मिनिटांनी
२) स्वारगेट ः स्वारगेट - दादर ः ५३५ ः शिवनेरी ः सकाळी ६ पासून दर एका तासाला
ठाणे ः ५१५ ः शिवनेरी ः सकाळी ६ पासून दर एका तासाला
दौंड ः साधी बस ः आवश्यकतेनुसार
सोलापूर ः ५५५ ः शिवशाही ः आवश्यकतेनुसार
कोल्हापूर ः ४९५ ः शिवशाही ः सकाळी ६ पासून दर एका तासाला
कल्याण ः आवश्यकतेनुसार
तांदळी ः आवश्यकतेनुसार

३) बारामती ः बारामती-स्वारगेट ः शिवशाही ः सकाळी ६ पासून दर एका तासाला
(जेजुरी, नीरा, वालचंद नगर, भिगवन, रांजणगाव, एमआयडीसी,


फलटण, शिर्सुफळ) या मार्गावर साधी बस
४) एमआयडीसी ः स्वारगेट ः साधी बस ः आवश्यकतेनुसार
५) दौंड ः बारामती, अहमदनगर, चौफुला, स्वारगेट, सातारा, कोल्हापूर, काष्टी ः साधी बस
६) पिंपरी-चिंचवड ः नाशिक ः आवश्यकतेनुसार
७) इंदापूर ः अकलूज, बारामती, स्वारगेट
८) भोर ः कारी, टिटेघर, म्हसर, शिरवळ, कोर्ले, धोंडेवाडी, म्हडूडे, नीरा, स्वारगेट

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top