डाहूलीत मोबाईल टाॅवर; थोरण, जांभवलीत कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डाहूलीत मोबाईल टाॅवर; थोरण, जांभवलीत कधी?
शेतमाल साठवणूक करणारे फायदेशीर तंत्रज्ञान

डाहूलीत मोबाईल टाॅवर; थोरण, जांभवलीत कधी?

sakal_logo
By

कामशेत,ता.२१: हातात मोबाईल तोही स्मार्ट परंतु नेटवर्क नसल्यामुळे महागड्या मोबाईलचा दुर्गम भागात उपयोग होत नसायचा. इतकेच काय दोन वर्षं ऑनलाइन शिक्षणाचे कितीही धडे आले तरी विद्यार्थ्यांना ते कधीच गिरवता आले नाहीत, की ऑनलाइन अभ्यास समजून घेता आला नाही, ह्या सर्व व्यथा दैनिक ‘सकाळ’ मागील चार वर्षापासून सातत्याने मांडत होते, याची दखल घेत डाहूली ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव शेलार यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत हद्दीत मोबाईल टॉवर उभा राहतोय त्यामुळे या भागातील नेटवर्कची समस्या आता मिटणार आहे.
मावळ तालुक्यातील डाहूली, खांडी, निळशी, सावळा, माळेगाव, पिंपरी, तळपेवाडी, कुणे, अनसुटे, इंगळूण या परिसरात नेटवर्क नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, अधिकारी व मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठांशी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे डाहूली ग्रामपंचायत हद्दीत मोबाईल टॉवर उभा राहणार आहे. त्याचा फायदा पंचक्रोशीतील पंचवीस गावांना मिळणार आहे.
या परिसरातील नेटवर्कची समस्या मिटणार असली तरी थोरण, जांभवली, शिरदे, सोमवडी, भाजगाव, उंबरवाडी, कोळवाडी, उकसान, या पंचक्रोशीतील नेटवर्कची गैरसोय कायम असल्याची खंत उकसानचे युवक कार्यकर्ते विलास गायकवाड यांनी व्यक्त केली. या भागातील पंधरा गावे, वाड्या, वस्त्या आजही नॉटरिचेबल असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे या भागातही मोबाईल टाॅवर उभा करावा, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे.

आमच्या भागात मोबाईल टाॅवर उभा राहतोय, याचा आम्हाला आनंद आहे. मोबाईलला पूर्ण क्षमतेने रेंज मिळाल्यामुळे ऑनलाइन अभ्यास करता येईल.
-चैतन्य तुर्डे, विद्यार्थी

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top