
‘सेवा रस्त्याची जोड नायगावमध्ये द्यावी’
कामशेत, ता. ३१ : पुणे-मुंबई महामार्गालगत असलेल्या नायगावला सेवा रस्त्याची जोड द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कामशेत व कान्हे गावच्या मध्यावर असलेले हे गाव. कामशेत व कान्हे या दोन्ही गावांचा विस्तार होत आहे. तसा नायगावचा विस्तार अधिक होतोय.
गावात येता जाता रस्ता ओलांडून जाणे धोकादायक ठरत आहे. या ठिकाणी रस्ता ओलांडताना तीव्र उतार आहे. त्यामुळे या ठिकाणी अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. छोटे-मोठे अपघात होत असतात. संपूर्ण गामस्थांची शेती व काही ग्रामस्थांची घरी महामार्गाच्या पलीकडे असल्याने रस्ता ओलांडावा लागत असतो. आंबेडकर चौक ठिकाणी रस्ता दुभाजक आहे. या ठिकाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात. या ठिकाणी सर्व्हिस रोडची नागरिकांची सातत्याने मागणी आहे. या रस्त्याच्या तीव्र उतार कमी करून कात्रज डेअरी जवळून सर्विस रोड येथील नागरिकांना मिळावा, अशी मागणी कुणाल ओव्हाळ, दिलीप वावरे, रघुनाथ चोपडे, भाऊसाहेब लालगुडे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी केली आहे.
नायगाव ः महामार्गावरील धोकादायक रस्ता दुभाजक.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..