गुजरी जत्रा

गुजरी जत्रा

१६९६२

राजर्षी शाहूंमुळे व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज; गुजरी सुवर्ण जत्रेचे उद्‍घाटन; सराफ कट्ट्याला झळाळी
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २२ : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापुरात गुजरी वसवल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले,’ असे प्रतिपादन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी आज येथे केले. जिल्हा प्रशासनातर्फे राजर्षी छत्रपती शाहू कृतज्ञता पर्वानिमित्त आयोजित गुजरी जत्रेच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. दरम्यान, व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर आकर्षक रांगोळ्या काढून रोषणाई केली. ग्राहकांना मजुरीवर सवलत जाहीर करत त्यांचे स्वागत केले. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमा ठिकठिकाणी लावल्या. गुजरी येथे कार्यक्रम झाला.
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज द्रष्टे राजे होते. प्रजेच्या कल्याणाचा त्यांनी सातत्याने विचार केला. व्यापाऱ्यांना आर्थिक समृद्धता मिळवून देण्यासाठी शहरात त्यांनी गुजरी वसवली. त्या माध्यमातून कलाकुसरीचे दागिने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना मिळाली.’’
सुवर्ण कलेला ऊर्जितावस्था आणण्यासाठी पालकमंत्र्यांनी जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे प्रयत्न करावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, ‘‘शाहू महाराज कर्तृत्ववान राजे होते. त्यांच्यामुळे आर्थिक सुबत्ता आली. विकासाचे रोल मॉडेल म्हणून कोल्हापूर विकसित झाले. विकासाचा दृष्टिकोन कसा असावा, हे त्यांच्या कार्यातून शिकायला मिळते.’’
जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले, ‘‘इथल्या व्यापाऱ्यांनी कलेचे संवर्धन केले आहे. कलाकुसरीचे दागिने करण्याची कला जोपासली आहे.’’
या वेळी आमदार जयश्री जाधव, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे, माजी नगरसेवक ईश्वर परमार, कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश राठोड, उपाध्यक्ष विजय हावळ, सचिव प्रीतम ओसवाल, तेजस धडाम, कुलदीप गायकवाड, नंदकुमार बेलवणकर, विजय पवार, अशोक ओसवाल, पृथ्वीराज पाटील, ललित ओसवाल, कोल्हापूर जिल्हा सराफ व सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल, महाराष्ट्र राज्य सराफ व सुवर्णकार संघाचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत उपस्थित होते.

इमारतीवर रोषणाई
कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या महाद्वार रोड संभवनाथ चौकातील इमारतीवर रोषणाई करण्यात आली. तसेच गुजरी रोडवर दसरा चौकातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिकृती साकारण्यात आली.


लॉकेटचे अनावरण
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते गोपी नार्वेकर यांनी साकारलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिकृतीतील सुवर्ण लॉकेटचे अनावरण झाले. ते सुमारे अडीच ते तीन ग्रॅमचे आहे.


आजचे कार्यक्रम
- सकाळी १० वाजता - राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे दुर्मिळ छायाचित्र, काही निवडक आदेश, कागदपत्र यांचे प्रदर्शन- छत्रपती शाहू मिल
- सायंकाळी ७ वाजता- शाहिरी पोवाडा कार्यक्रम- छत्रपती शिवाजी महाराज चौक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com