Pune Municipal
Pune MunicipalSakal

पुण्यातील शाश्वत वाहतुकीसाठी ५१५ कोटी रुपयांची तरतूद करणे गरजेचे

पुणे शहरातील १० टक्के वाहतूक खाजगी वाहनांनी व्हावी असे पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचे उद्दिष्ट आहे.
Summary

पुणे शहरातील १० टक्के वाहतूक खाजगी वाहनांनी व्हावी असे पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचे उद्दिष्ट आहे.

पुणे - शहरात वाढत असलेल्या वाहतुकीच्या (Traffic) कोंडीची डोकेदुखी कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ९० टक्के वाहतूक ही चालणे, सार्वजनिक वाहतूक आणि सायकल ह्या तीन साधनांनी व्हावी, यासाठी पायाभूत सुविधांची निर्मिती करणे गरजेचे आहे. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात (Municipal Budget) ५१५ कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी विनंती शहरातील विविध स्वयंसेवी संस्थांनी एकत्र येत महापालिकेला केली आहे.

शहरातील १० टक्के वाहतूक खाजगी वाहनांनी व्हावी असे पुणे शहराच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचे उद्दिष्ट आहे. या उद्देशाने महापालिका गेली ४-५ वर्षे आपल्या वाहतूकविषयक तरतुदींपैकी सुमारे ५० टक्के तरतूद (सुमारे ५०० कोटी रु.) शाश्वत साधनांच्या पायाभूत सुविधांसाठी राखून ठेवत आहे. हा पायंडा पुढे चालू ठेवत महपालिकेने २०२२-२३ च्या अर्थसंकल्पामध्येही सुमारे ५१५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करावी, या मागणीचे पत्र सेव्ह पुणे ट्राफिक मूव्हमेंट (एसपीटीएम), परिसर, पर्यावरण शिक्षण केंद्र (सीईई) या संस्था आणि सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक प्रांजली देशपांडे यांनी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांना नुकतेच दिले. ११ डिसेंबर रोजी साजरा झालेल्या पादचारी दिनामुळे दुभाजकांदरम्यान रस्ते ओलांडण्याची सोय, तसेच चौकांमध्ये झेब्रा पट्ट्या अशा सुविधांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

Pune Municipal
गुरुवारपासून पुणे-बारामती व बारामती-दौंड रेल्वे सेवा होणार सुरु

संस्कृती मेनन (सीईई) - सायकल मार्ग सलग नसणे ही शहरातील प्रमुख समस्या आहे. महापालिकेच्या सायकल आराखड्यात ४०० किलोमीटरहून अधिक लांबीचे सायकल मार्ग प्रस्तावित आहेत. गेल्या ३ वर्षांमध्ये यातील २००-३०० किलोमीटरचे मार्ग तयार झाले असते, तर ते लोकांना वापरता आले असते.

रणजित गाडगीळ (परिसर) - ‘इंडियन रोड काँग्रेस’ च्या मार्गदर्शकांनुसार ठराविक अंतराने रस्ते ओलांडायची सोय असणे आवश्यक आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मंजूर केलेल्या पादचारी धोरणानुसार, दोन सिग्नलदरम्यान देखील रस्ते ओलांडण्यासाठी उत्तमरीत्या डिझाईन केलेली क्रॉसिंग आवश्यक आहेत. त्यामुळे पादचारी विशिष्ट ठिकाणीच रस्ता ओलांडतील. येत्या वर्षात अशी निदान ५० क्रॉसिंग तयार व्हावीत.

हर्षद अभ्यंकर (एसपीटीएम) - गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यात काही चांगले पदपथ तयार झाले आहेत, पण त्यामुळे रस्ता अरुंद झाल्याची ओरड होते. त्यामुळे पादचारी सुरक्षित चालू शकतातच, पण वाहन चालवताना येणारा ताणही कमी झाला आहे. म्हणून या वर्षी असे किमान ५० किलोमीटर लांबीचे पदपथ शहरात करावेत, अशी आमची अपेक्षा आहे.

Pune Municipal
आजारी मालकाला ड्रायव्हरने घातला ५१ लाखांना गंडा

प्रांजली देशपांडे (सार्वजनिक वाहतुकीच्या अभ्यासक) - घरांपासून ५-१० मिनिटांत सार्वजनिक वाहतुकीची सोय केवळ पीएमपी देऊ शकते. ही सेवा सक्षम होण्यासाठी महानगरपालिकेने गुंतवणूक केल्यास वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी होण्याबरोबरच खाजगी वाहनांच्या सोयीसाठी खर्च होणारा कितीतरी पैसा वाचू शकतो. म्हणून पीएमपीसाठी ५०० बसेस आणि बीआरटी स्थानकांची डागडुजी करण्यासाठी तरतूद करण्याची गरज आहे.

शहरात हे व्हायला हवे

- शहरातील लहान- मोठ्या ५० किलोमीटर रस्त्यांवर स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन्स नुसार रुंद पदपथ आणि सायकल मार्गांच्या सोयी पुरवणे

- जुन्या ५० किलोमीटर सायकल मार्गांची डागडुजी करणे

- सार्वजनिक वाहतुकीसाठी ५०० बसेस उपलब्ध करणे

- दोन सिग्नल दरम्यान उत्तम डिझाईन केलेली ५० क्रॉसिंग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com