जिल्हा बॅंकेच्या नव्या अध्यक्षांची निवड १५ जानेवारीला  
पुणे जिल्हा बॅंकेच्या नव्या अध्यक्षांची येत्या १५ जानेवारीला निवड

जिल्हा बॅंकेच्या नव्या अध्यक्षांची निवड १५ जानेवारीला पुणे जिल्हा बॅंकेच्या नव्या अध्यक्षांची येत्या १५ जानेवारीला निवड

पुणे, ता. ७ : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) नवे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष १५ जानेवारीला निवडले जाणार आहेत. या नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीसाठी जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) मिलिंद सोबले निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. या निवडीसाठी जिल्हा बॅंकेच्या नवीन संचालक मंडळाची पहिली सभा दुपारी १ वाजता बोलाविण्यात आली आहे.

बॅंकेच्या संचालक मंडळाच्या २१ पैकी १६ जागा जिंकत राष्ट्रवादी काँग्रेसने बॅंकेवर एकहाती वर्चस्व स्थापित केले आहे. या १६ जणांना एका अपक्षाची साथ मिळणार आहे. हवेली तालुका अ वर्ग मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचेच विकास दांगट अपक्ष निवडून आले आहेत. ते केवळ तांत्रिकदृष्ट्या अपक्ष आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमधून जिल्हा बॅंकेवर निवडून आलेल्या १६ मध्ये ९ अनुभवी व जुन्या संचालकांचा समावेश असून, उर्वरित ७ जण नवीन आहेत. जुन्या नऊ संचालकांपैकी तीन मंत्री व चार मावळते व माजी अध्यक्ष आहेत. जुन्यांमधून केवळ दोघांनाच आतापर्यंत जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळालेली नाही. या दोघांमध्ये एक आमदार आहेत. त्यामुळे अध्यक्षपदाची माळ मावळते अध्यक्ष रमेश थोरातच यांच्या गळ्यात पडणार की जुन्या संचालकांमधील नव्या चेहऱ्याला संधी देणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन पदांपैकी एक पद नव्या चेहऱ्याला मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com