नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील 
विशेष टपाल तिकिटाचे अनावरण
नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण

sakal_logo
By

पुणे - ‘देशभरात टपाल विभागाचे (Post Department) जाळे विस्तारले आहे. त्याचा उपयोग करून टपाल विभागाच्याच सेवा नव्हे, तर इतरही अनेक सेवा लोकांपर्यंत पोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. लॉकडाउनच्या काळात अनेक व्यवसाय आणि कार्यालये बंद होती. मात्र टपाल विभागाचे पोस्ट ऑफिस (Post Office) त्याही काळात कार्यरत होते. आज जग डिजिटल होत असले तरी अनेक कामांसाठी पोस्टमन अथवा पोस्टाच्या विविध सेवांची गरज भासते. या सर्व गरजांची पूर्तता करण्यासाठी आणि सामन्यांच्या सेवेसाठी टपाल विभाग कायमच कटिबद्ध आहे,’ अशी ग्वाही पुण्याच्या पोस्टमास्टर जनरल मधुमिता दास यांनी शुक्रवारी दिली.

भारतीय टपाल विभाग व मावळ जवान संघटना यांच्यातर्फे नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यावरील विशेष टपाल तिकिटाचे अनावरण दास यांच्या हस्ते नवी पेठ येथील पत्रकार भवनमध्ये झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. ‘‘मावळ्यांचा इतिहास सर्वसामान्यांपर्यंत पोचला पाहिजे, अशी आमची भावना आहे. घडलेला इतिहास आपल्याला जपायचा आहे. आजच्या या विशेष टपाल तिकिटामार्फत अधिकाधिक लोकांपर्यंत मावळ्यांचे कार्य पोचेल,’’ असे मत तानाजी मालुसरे यांच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.

हेही वाचा: ‘सर्वांसाठी घरं’ उपक्रम प्राधान्याने राबविणार : उपमुख्यमंत्री अजित पवार

या वेळी मावळा जवान संघटनेतर्फे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक यांना ‘नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे शौर्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. तसेच दत्ता नलावडे लिखित ‘छत्रपती शिवरायांचे कष्टकरी मावळे’ या पुस्तकाच्या कृष्णकुमार गुप्ता यांनी हिंदीत अनुवादित केलेल्या ‘विश्व के महानायक छत्रपती राजे शिवाजी और उनके वीर साथी’ या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमाला स्वराज्यसेवक येसाजी लगड यांचे वंशज ॲड. नरसिंह लगड, माजी आमदार कांता नलावडे, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, ‘वी पुणेकर’ संस्थेचे अध्यक्ष पराग मते, लेखक नामदेव जाधव, मावळ जवान संघटनेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष गोविंद पिंपळगावकर आदी उपस्थित होते. या वेळी दत्ता नलावडे यांनी प्रास्ताविक केले तर उमेश अहिरे यांनी आभार मानले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Stamppost office
loading image
go to top