पुण्यात २० जानेवारीपासून ‘वसंतोत्सवा’चे आयोजन रसिकांना शास्त्रीय संगीत, तालवाद्य, गझल गायनाची पर्वणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात २० जानेवारीपासून
‘वसंतोत्सवा’चे आयोजन 
रसिकांना शास्त्रीय संगीत, तालवाद्य, गझल गायनाची पर्वणी
पुण्यात २० जानेवारीपासून ‘वसंतोत्सवा’चे आयोजन रसिकांना शास्त्रीय संगीत, तालवाद्य, गझल गायनाची पर्वणी

पुण्यात २० जानेवारीपासून ‘वसंतोत्सवा’चे आयोजन रसिकांना शास्त्रीय संगीत, तालवाद्य, गझल गायनाची पर्वणी

sakal_logo
By

पुणे, ता. १० : डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठान आणि एमआयटी विश्वशांती विद्यापीठातर्फे १५व्या ‘वसंतोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. स्वारगेट येथील गणेशकला क्रीडा रंगमंच येथे येत्या २० ते २३ जानेवारी दरम्यान हा
महोत्सव होणार असल्याची माहिती डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू व शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांनी दिली.

यंदाच्या वसंतोत्सवात शास्त्रीय संगीतासह तालवाद्य, दाक्षिणात्य व हिंदुस्थानी संगीत, लाइट म्युझिक आणि गझल यासारख्या वैविध्यपूर्ण संगीत प्रकारांची रेलचेल असेल. पहिल्या दिवशी (ता. २०) फरुखाबाद घराण्याचे सतार व तबलावादक पं. नयन घोष व त्यांचे सुपुत्र ईशान घोष आणि व्हायोलिनवादक एल. सुब्रमण्यम यांचे सादरीकरण होईल. दुसऱ्या दिवशी व्हायोलिनवादक पं. अतुलकुमार उपाध्ये आणि बासरीवादक प्रवीण गोडखिंडी यांची जुगलबंदी व जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांचे गायन रसिकांना अनुभवता येईल.
तिसऱ्या दिवशी सौरभ काडगांवकर यांचे गायन, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा ‘टॉक शो’ आणि ‘राहुल देशपांडे कलेक्टीव’ हा लाइट म्युझिकवर आधारित कार्यक्रम होईल. समारोपाच्या दिवशी ढोलकीवादक नीलेश परब आणि कृष्णा मुसळे यांचे ढोलकीवादन आणि अनुप जलोटा यांचा गझल व गीतांचा कार्यक्रम होईल. महोत्सवाची सांगता राहुल देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनाने होणार असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top