विकासकामांचा अहवाल सादर करा

विकासकामांचा अहवाल सादर करा

पुणे, ता. १० : अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याची अंमलबजावणी कालमर्यादेत, गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार पद्धतीने करावीत. भाविकांना वेळेत योग्य पायाभूत सुविधा उपलब्ध होतील, अशा प्रकारे ही कामे पूर्ण करण्यात यावीत, तसेच सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा अहवाल १५ दिवसांत सादर करावा, अशा सूचना विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
डॉ. गोऱ्हे यांनी ११ ते १३ डिसेंबर २०२१ या कालावधीत अष्टविनायक तीर्थक्षेत्राचा दौरा केला. त्यानंतर अष्टविनायक तीर्थक्षेत्र स्थळांच्या सर्वांगीण विकासाच्या आराखड्याच्या अंमलबजावणीविषयी दूरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित बैठकीत उपसभापती डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. या बैठकीस नगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, रायगडचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, महड, पाली, ओझर, लेण्याद्री आणि रांजणगाव या अष्टविनायक देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्या आणि सुविधा विकसित करण्याविषयी माहिती दिली. संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागांचे अधिकारी, मुख्याधिकारी यांनी सुरू असलेल्या विकासकामांबाबत माहिती दिली.

प्रशासनाने देवस्थानच्या ठिकाणी अपुरी कामे पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावे. त्यासाठी छोटी- छोटी कामे करण्यासाठी स्थानिक पातळीवर निधी उपलब्ध करावा. देवस्थान स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात निर्जंतुकीकरण करावे.
-डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com