गरवारे महाविद्यालयात आवर्तसारणीचे प्रात्यक्षिकातून सादरीकरण

गरवारे महाविद्यालयात आवर्तसारणीचे प्रात्यक्षिकातून सादरीकरण

पुणे, ता. ८ : आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाने मानवी आवर्तसारणी प्रदर्शित केली आहे. रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी यात सक्रिय सहभाग नोंदविला. केवळ पुस्तकी अभ्यास न करता प्रयोगातून विज्ञान समजून घेण्याचा हा प्रयत्न होता. यात विद्यार्थ्यांनी वेगवेगळे मूलद्रव्य बनून आपली जागा घेतली आणि त्याद्वारे मेंडेलिव्हची ११८ मूलद्रव्यांची आवर्तसारणी अनोख्या प्रकारे साकारली. यासाठी रसायनशास्त्र विभागाच्या प्रमुख प्रा. शोभा वाघमोडे, प्राचार्य पी.बी. बुचडे यांनी मार्गदर्शन केले. यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे ओंकार विधाते, हृदांशु गवळी, अनुप द्विवेदी, श्रीकृष्णा कातपुरे यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com