‘कर्वेनगरमधील घटनेची सखोल चौकशी करा’

‘कर्वेनगरमधील घटनेची सखोल चौकशी करा’

पुणे, ता. ७ ः कर्वेनगरमधील घटनेत तरुणीने महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण करण्यापूर्वी पोलिसांनी तरुणीला प्रचंड त्रास दिला. त्यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी छावा क्रांतिकारी सेनेच्या युवा महिला प्रदेशाध्यक्ष छाया खैरनार यांनी संभाजी राजे छत्रपती व पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्याकडे केली. मागील आठवड्यात कर्वेनगर पोलिस चौकीत तरुणीकडून महिला पोलिस कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल केला होता. याप्रकरणात तरुणी व तिच्या आईविरुद्ध पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. संबंधित प्रकरणी कर्वेनगर पोलिसांनी तक्रार घेतली नाही, तसेच अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबीयांनी केला होता. याप्रकरणी संघटनेकडून खैरनार, ईशा साळुंके, सुंदर पिल्ले, बिपिन दवेचा, रवी सातपुते यांनी संभाजी राजे छत्रपती व पोलिस आयुक्तांना निवेदन दिले. तरुणीने पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ पोलिसांनी जाणीवपूर्वक व्हायरल करून तिची बदनामी केली. परंतु, त्यापूर्वी असे काय घडले, की उच्चशिक्षित तरुणीवर हात उचलण्याची वेळ आली. पोलिसांनी तरुणीची तक्रार घेतली नाही तसेच, त्याविषयी वरिष्ठांकडे तक्रार केल्याच्या रागातून तरुणीला त्रास दिला, असे खैरनार यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com