कथालेखन स्पर्धेत विजय शेंडगे प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कथालेखन स्पर्धेत विजय शेंडगे प्रथम
कथालेखन स्पर्धेत विजय शेंडगे प्रथम

कथालेखन स्पर्धेत विजय शेंडगे प्रथम

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या चित्रपट आणि सांस्कृतिक विभागाने आयोजित केलेल्या कथालेखन स्पर्धेत विजय शेंडगे यांनी प्रथम तर गणेश वैद्य, सारंग पापंटवार, संतोष गायकवाड, सविता करंजकर, बापू केदारी यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय आणि उत्तेजनार्थ पारितोषिके प्राप्त केली.
या स्पर्धेचा पुरस्कार वितरण सोहळा नुकताच घोले रस्ता येथील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात पार पडला. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक राजन लाखे, अभिनेते विजय पाटकर, अभिनेत्री प्रिया बेर्डे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, दिग्दर्शक राहुल देशपांडे, एम. के. स्टुडिओचे मच्छिंद्र धुमाळ आदी उपस्थित होते.
लाखे म्हणाले, ‘‘उत्तम लेखन ही सामाजिक गरज आहे. लेखकांनी लिहिताना पूर्ण विचार करून लिहायला हवे. वरपांगी केलेले लेखन रसिकांना निराश करते, आणि रसिक पुस्तकांपासून दुरावतात.’’
लेखकांना, कलावंतांना व्यासपीठ मिळते आहे, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. परंतु प्रत्येकाने आपल्या कलेशी, शब्दांशी एकनिष्ठ राहायला हवे, असे पाटकर म्हणाले.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top