इंग्रजी बोलणे वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंग्रजी बोलणे वर्ग
इंग्रजी बोलणे वर्ग

इंग्रजी बोलणे वर्ग

sakal_logo
By

एपीजी लर्निंग

इंग्रजी बोलणे शिकवणारा वर्ग
पुणे, ता. ११ : इंग्रजीमध्ये अस्खलितपणे व सहजतेने बोलण्याचे उद्दिष्ट असणाऱ्यांसाठी प्रोफेशनली इंग्रजी बोलणे शिकवणारे एक महिन्याचे ऑनलाइन प्रशिक्षण वर्ग १८ जानेवारीपासून सुरू होत आहेत. करिअरमधील प्रगतीसाठी इंग्रजी बोलण्याचे कौशल्य अत्यंत आवश्यक आहे. यामध्ये इंग्रजी व्याकरण, शब्दसंग्रहासह इंग्रजी बोलण्याचे शिष्टाचार, योग्य देहबोली व स्वर, समूह चर्चा, मुलाखत व सादरीकरण करताना बोलण्याचे कौशल्य शिकवण्यात येईल. अधिक अचूक बोलण्यासाठी भरपूर सराव, प्रात्यक्षिक सत्रे, वैयक्तिक लक्ष व वेळोवेळी मूल्यांकन यावर भर असणार आहे. जगात कुठेही इंग्रजीमध्ये संवाद साधण्याचे कौशल्य व आत्मविश्‍वास या प्रशिक्षणामधून मिळेल. प्रतिव्यक्ती शुल्क ४२३७ रुपये.
संकेतस्थळ : https://bit.ly/apgenglish_course
संपर्क : ७३५०००१६०३

SIILC

पॅकेजिंग इंडस्ट्रीविषयी मार्गदर्शन
पुणे, ता. ११ : पेपर, कोरुगेटेड बॉक्स, लाकूड, प्लॅस्टिक इ.विविध प्रकारचे पॅकेजिंग मटेरिअल कसे बनवितात, छोटी पॅकेजिंग इंडस्ट्री सुरू करण्यासाठी आवश्यक भांडवल इ.विषयी सविस्तर माहिती करून देणारी चार दिवसांची वीकएन्ड कार्यशाळा शनिवारपासून (ता. १५) सुरू होत आहे. यात पॅकेजिंग उद्योगातील वाढत्या संधी, पॅकेजिंग युनिट सुरू करण्यासाठी आवश्यक बाबी इ.विषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. ज्यांना पॅकेजिंग इंडस्ट्रीमध्ये स्टार्टअप करायचे आहे, तसेच ज्यांचे पॅकेजिंग युनिट असून त्यांना यातील अद्ययावत तंत्रज्ञान जाणून घ्यावयाचे आहे, त्यांच्यासाठी ही कार्यशाळा फायदेशीर आहे. प्रतिव्यक्ती शुल्क दहा हजार रुपये.
संपर्क : ८६६९६८९०१५, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

शेतकरी उत्पादक कंपनीद्वारे बना स्वयंपूर्ण
शेतकरी उत्पादक कंपनी कशी स्थापन करावी, नोंदणीची प्रक्रिया आदींविषयी मार्गदर्शन करणारी दोन सत्रांची कार्यशाळा २२ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यात कंपनी स्थापनेसाठी आवश्यक संचालक, सभासदांची संख्या, कंपनीचा उद्देश आणि उद्दिष्ट, नोंदणी कुठे करावी, आवश्यक कागदपत्रे, कंपनी चालविण्याचे व्यवस्थापन व कार्यपद्धती, बिझनेस प्लॅन कसा बनवावा, इन्कमटॅक्स कम्प्लायंसेस, आरओसी कम्प्लायंसेस, एफपीसींना असलेल्या भविष्यातील संधी इ.विषयी अनुभवी सीए मार्गदर्शन करणार आहेत. कंपनी स्थापनेची तयारी असणाऱ्यांसाठी सेवा व मार्गदर्शन देण्याचेही नियोजन आहे. प्रतिव्यक्ती शुल्क एक हजार रुपये.
संपर्क : ७४४७४४३१९८, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

सफरचंद लागवडीतून मिळवा आर्थिक यश
आरोग्यवर्धक अशा सफरचंदाच्या फळाला देशात मोठी मागणी आहे. हजारो कोटी रुपयांचे सफरचंद दरवर्षी आयात केले जातात. त्यामुळे यशस्वीरीत्या राज्यातील उष्ण वातावरणात येणाऱ्या सफरचंदांच्या वाणाची लागवड केल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. या पार्श्‍वभूमीवर सफरचंद लागवडीविषयी मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २२ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये राज्यातील वातावरणात येईल अशा वाणांची माहिती, रोपांची खरेदी, लागवडीचे तंत्रज्ञान, फुलांचे आणि फळांचे व्यवस्थापन, रोग आणि कीड नियंत्रण, पाणी व खत व्यवस्थापन आदींविषयी मार्गदर्शन होईल. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.
संपर्क : ७६६६२३९४८७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

(ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top