जिल्ह्यातील ४० पर्यटनस्थळे राहणार बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यातील ४० पर्यटनस्थळे राहणार बंद
जिल्ह्यातील ४० पर्यटनस्थळे राहणार बंद

जिल्ह्यातील ४० पर्यटनस्थळे राहणार बंद

sakal_logo
By

पुणे, ता. ११ ः विकेंड म्हणलं की लवासा, सिंहगड, खडकवासला धरण परिसर, मुळशी धरण परिसर आदी ४० पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या मंडळींना आता घरातच राहावे लागणार आहे. पुणे वन विभागांतर्गत येणाऱ्या पर्यटनस्थळे नागरिकांसाठी बंद करण्यात आले आहेत. याबाबतची माहिती पुणे वन विभागाने दिली.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकारने दिलेल्या आदेशानुसार वन विभागाच्या वतीने पुण्यातील हवेली, मावळ, मुळशी, आंबेगाव, जुन्नर, भोर आणि वेल्हा या सात तालुक्यांतील सुमारे ४० पर्यटनस्थळे बंद केली आहेत. त्यात पुणेकरांचे सर्वात आवडीचे पर्यटनस्थळ असलेले सिंहगड आणि खडकवासला धरण परिसराचाही समावेश आहे. त्यामुळे आता सुट्यांमध्येही पुणेकरांना गड, किल्ल्यांवर भटकंती करता येणार नाही.
राज्य सरकारच्या आदेशानुसार, पुणे वन विभागाच्या हद्दीत येणारी पर्यटनस्थळे बंद केली आहेत. तसेच या नियमांचे पालन नागरिकांकडून होईल याची पाहणी केली जाईल. त्यासाठी वन उद्यान, जंगल, किल्ले आदी परिसरात वन रक्षक कार्यान्वित आहेत, असे वन विभागाने सांगितले.

प्रतिबंधित केलेले क्षेत्र ः
मावळ ः घुबड तलाव, भुशी, लोणावळा, तुंगार्ली, वळवण, पवना धरण, तिकोना, विसापूर, तुंग, लोहगड किल्ला, मंकी पॉइंट, लायन पॉइंट, वेहेरगाव, टायगर पॉइंट आदी
हवेली ः घेरा सिंहगड, सिंहगड किल्ला, डोणजे, खडकवासला धरण परिसर
जुन्नर ः शिवनेरी, सावंड, हडसर किल्ला, आंबे हातवीज, वडज धरण, माणिकडोह धरण, बिबटा निवारा केंद्र
भोर ः रोहडेश्र्वर/विचित्र गड, रायरेश्र्वर किल्ला, भाटघर धरण परिसर, निरादेवधर धरण, आंबवडे, भोर राजवाडा, मल्हारगड
वेल्हा ः तोरणा किल्ला, राजगड किल्ला, पानशेत धरण, वरसगाव धरण परिसर
आंबेगाव ः डिंभे धरण, आहुपे पर्यटनस्थळ
मुळशी ः लवासा, टेमघर व मुळशी धरण परिसर, पिंपरी दरी पॉइंट, सहारा सिटी, कोळवण परिसर

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top