जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जलाभिषेक

जिजाऊ जयंतीच्या पूर्वसंध्येला जलाभिषेक

पुणे, ता. ११ ः राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला लाल महालातील जिजाऊंच्या पुतळ्याला स्वराज्याची राजधानी शिवतीर्थ रायगडावरील पाण्याने जलाभिषेक करण्यात आला.
मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, अखिल भारतीय शिवमहोत्सव समिती, अखिल शिवाजीनगर शिवमहोत्सव समिती, राजर्षी शाहू महाराज सोशल फाउंडेशन व शिवप्रेमींच्या वतीने लाल महाल येथे जलाभिषेक व मशाल उत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र दुबल, संभाजी ब्रिगेडचे केंद्रीय निरीक्षक, अखिल भारतीय शिवमहोत्सव समितीचे अध्यक्ष विकास पासलकर, प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत धुमाळ, अविनाश मोहूते, राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष कैलास वडघुले, तानाजी शिरोळे, बाळू जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मंदार बहिरट, मुकेश यादव, तानाजी शिरोळे यांनी काम केले. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या निर्बंधानुसार मोजक्याच शिवप्रेमींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com