प्रोफेशनल आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रोफेशनल आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स
प्रोफेशनल आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स

प्रोफेशनल आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स

sakal_logo
By

एपीजी लर्निंग

प्रोफेशनल आर्टिस्ट सर्टिफिकेट कोर्स
पुणे, ता. २८ : चित्रकलेत प्रोफेशनल करिअर बनवण्यासाठी मदत करणारा ‘बिकम अ प्रोफेशनल आर्टिस्ट’ हा दोन महिन्यांचा अभ्यासक्रम ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. यामध्ये अनेक बारकाव्यांसह बेसिक पेंटिंग, फिगर स्टडी, स्टील लाइफ, पोर्ट्रेट्स आदींविषयी मार्गदर्शन केले जाईल. थिअरीसह तांत्रिक तपशीलावर भर दिला जाईल. ब्रशेसचे प्रकार, स्पॅच्युला व रोलर्सचा वापर, पेंटिंग जतन करण्याच्या पद्धती, वास्तववादी आकृती, काल्पनिक रचना आदींचा तपशीलवार सराव करून घेण्यात येणार आहे. ड्रॉइंग शीट, कापड, काच, पेन्सिल, कोळसा, ब्रश पेन, वॉटर पेंट, ऑइल पेंट, ॲक्रिलिक पेंट इत्यादींसारख्या भिन्न सामग्रींचा वापर करून हा सराव घेण्यात येईल. प्रतिव्यक्ती शुल्क वीस हजार रुपये.
संपर्क : ७३५०००१६०२, संकेतस्थळ : https://bit.ly/apg_sketching

SIILC
शिका कोल्हापुरी, मालवणी नॉनव्हेज थाळी
पुणे, ता. १२ : कोल्हापूरचा झणझणीत तांबडा-पांढरा व मालवणी कोंबडी वडे तसेच, गावरान चिकन थाळी घरच्या घरी बनवायला शिकवणारी ऑनलाइन कार्यशाळा २१, २२ व २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये मटण मसाला, मटण खिमा, गावरान चिकन मसाला, चिकन सुख्खा, चिकन फ्राय, चिकन अळणी, अंडा करी, फिश करी, फिश फ्राय, प्रॉन्स कोळीवाडा, प्रॉन्स पुलाव, जीरा राइस, सोलकढी आदी थाळीमधील सर्व पदार्थ त्यांच्या सिक्रेट टिप्स व ट्रिक्ससह शिकवले जातील. प्रतिव्यक्ती शुल्क २००० रुपये.
संपर्क : ७६६६२३९४८७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

व्यावसायिक मेंढीपालनाविषयी कार्यशाळा
लोकरबरोबरच बोल्हाईच्या मटणासाठी मेंढीपालन केल्यास फायदेशीर ठरते. या पार्श्‍वभूमीवर व्यावसायिक तत्त्वावर बंदिस्त मेंढीपालन करता येईल का, शेळ्यांप्रमाणे मेंढ्या बंदिस्त होऊ शकतात का, बोल्हाई मटण म्हणजे काय असतं, परदेशात बोल्हाईच्या मटणाला मागणी आहे की शेळीच्या, मेंढी पालनाचे संपूर्ण अर्थशास्त्र व वेगवेगळ्या सुधारित जाती, चारा नियोजन, आरोग्य व्यवस्थापन आणि अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन करणारी ऑफलाइन कार्यशाळा २२ व २३ जानेवारी रोजी आयोजिली आहे. प्रतिव्यक्ती शुल्क ३५०० रुपये.
संपर्क : ९८८१०९९७५७, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

गांडूळ खतनिर्मिती युनिट उभारणीविषयी मार्गदर्शन
गांडूळ खत हे आज उपलब्ध असलेल्या सेंद्रिय खतांपैकी एक उत्कृष्ट खत आहे. गांडूळ खत युनिटसाठी लागणारे सर्व साहित्य शेतकऱ्यांकडे सहज उपलब्ध होत असते. ही सामग्री वापरून युनिट उभारणी करून चांगल्या प्रतीचे गांडूळ खत उत्पादन करणे सहज शक्य आहे. याबाबत मार्गदर्शन करणारी कार्यशाळा २९ जानेवारी रोजी आयोजिली आहे. यामध्ये खतासाठी गांडूळाच्या योग्य प्रजाती, जागेची निवड व बांधणी, खाद्य, खत तयार करण्याच्या पद्धती, फायदे व शेतीसाठी उपयोग आदींविषयी मार्गदर्शन होणार आहे. गांडूळखत प्रकल्पाला शिवारफेरीही आयोजिली आहे. प्रतिव्यक्ती शुल्क १५०० रुपये.
संपर्क : ७४४७४४३१९८, संकेतस्थळ : https://bit.ly/3DQc3HR

(ठिकाण : सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे.)

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top