नगरच्या बिझनेस हबकडे पुणेकरांचे लक्ष

नगरच्या बिझनेस हबकडे पुणेकरांचे लक्ष

पुणे, ता. १२ ः नगर शहरात भव्य असा बिझनेस हब व आलिशान निवासाचा प्रकल्प साकारत आहे. मॉल, मनोरंजन, ऑफिसेस, स्टार हॉटेल असलेला ‘ऑरम बिझनेस हब’ आणि ‘ऑरो रेसिडेन्सेस’ हा गृहप्रकल्प दोन एकरांच्या प्रांगणात निर्माण होत आहे. पुणे, मुंबईच्या तोडीचा हा प्रकल्प नगरची शान वाढविणारा आहे. हा प्रकल्प शहराची आधुनिक ओळख निर्माण करणारा ठरेल. पुणे, नाशिककरांनाही हा प्रकल्प अधिक फायदेशीर होईल, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.
नगर-मनमाड रस्त्यावर गरुड हॉस्पिटलशेजारी असलेल्या ऑरम बिझनेस हब व ऑरो रेसिडेन्सेस या प्रकल्पाचा प्रारंभ शनिवारी झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार जगताप बोलत होते. साई मिडास, वेंकटेश आणि महावीर या तीन व्हेंचर्सची संयुक्त निर्मिती असलेला ऑरम बिझनेस हब हा सर्व सुविधायुक्त प्रकल्प आहे. कार्यक्रमास माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, जितोचे विजय भंडारी, विजय मर्दा, राजेश भंडारी, ॲड. जयवंत भापकर, मयूर शेटिया, हेमचंद्र इंगळे, प्रभाकर बोरकर, गणेश गोंडाळ यांच्यासह नगरसह राज्यातील उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक आदी उपस्थित होते. या वेळी कर्डिले, आमदार संग्राम जगताप यांची भाषणे झाली. राजेश भंडारी यांनी आभार मानले.
या प्रकल्पात स्मार्ट ऑफिसेस ६०० ते एक हजार ८७९ स्क्वेअर फुटांची असतील. डॉक्टर, वकील, सी. ए. यांसारख्या ऑफिससाठी उपयुक्त आहेत. महावीर ग्रुपतर्फे ऑरो रेसिडेन्सेस हा गृहप्रकल्प असून, त्यामध्ये १९५३ ते २९३६ स्क्वेअर फुटांचे फ्लॅट्स आहेत. आधुनिक आणि दर्जेदार सुविधा असलेला हा प्रकल्प नगरमध्ये असला, तरी पुण्यातील कंपन्या किंवा गुंतवणूकदारांसाठीही तो फायद्याचा असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com