एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना देणार भगवद्‍गीता प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची घोषणा; स्वामी विवेकानंद जयंती साजरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना देणार भगवद्‍गीता
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची घोषणा; स्वामी विवेकानंद जयंती साजरी
एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना देणार भगवद्‍गीता प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची घोषणा; स्वामी विवेकानंद जयंती साजरी

एमआयटीतर्फे विद्यार्थ्यांना देणार भगवद्‍गीता प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांची घोषणा; स्वामी विवेकानंद जयंती साजरी

sakal_logo
By

पुणे, ता. १२ ः विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भगवद्‍गीतेच्या सव्वालाख प्रतींचे विद्यार्थ्यांना वितरण केले जाणार आहे, अशी घोषणा एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी केली. एमआयटीतर्फे स्वामी विवेकानंद यांची १५९ वी जयंती विद्यापीठात साजरी करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. ‘‘स्वामी विवेकांनदांनी जगाला भारताची ओळख करून दिली. ते दूरदृष्टी आणि वाचासिद्धी असलेले युगपुरुष होते. धर्म, प्रार्थना आणि ज्ञान याबद्दलचे विवेचन योग्य प्रकारे विवेकानंदांनी जगासमोर मांडले. प्रत्येकाने त्यांचा आदर्श घ्यायला हवा,’’ असे मत डॉ. कराड यांनी व्यक्त केले. या प्रसंगी माईर्स एमआयटीचे संस्थापक विश्वस्त प्रा. प्रकाश जोशी, एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर. एम. चिटणीस, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद खांडेकर, कुलसचिव डॉ. प्रशांत दवे, पीस स्टडीजचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद पात्रे, प्रा. निरंजन खैरे व विष्णू भिसे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top