कमला नेहरू रुग्णालयाच्या आयसीयूला मुहूर्त मिळेणा

कमला नेहरू रुग्णालयाच्या आयसीयूला मुहूर्त मिळेणा

Published on

पुणे, ता. १२ : पुणेकरांना चांगली आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन देणाऱ्या पुणे महापालिकेला कमला नेहरू रुग्णालयातील आयसीयू सुरू करता आलेला नाही. दोन वर्षापूर्वी आयसीयूसाठी एका संस्थेशी करार केला, आवश्यक साहित्य व यंत्रसामग्री खरेदी केली. आता हा आयसीयू वैद्यकीय महाविद्यालयासाठीही वापरला जाणार असला तरीही आयसीयू सुरू होण्यासाठी मुहूर्त सापडलेला नाही.

पुणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून कमला नेहरू रुग्णालयाचे नूतनीकरण केले होते. या रुग्णालयात अत्यावश्यक व आधुनिक पद्धतीने सेवा पुरविल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते.
महापालिकेच्या रुग्णालयात गंभीर आजारांवर उपचार येणारे नागरिक असतात. त्यांची प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना त्वरित आयसीयूमध्ये दाखल करणे आवश्यक असते. पण महापालिकेच्या एकाही रुग्णालयामध्ये आयसीयू उपलब्ध
नसल्याने या रुग्णांना ससून रुग्णालय किंवा खासगी रुग्णालयात हलवावे लागते. पालिकेच्या दवाखान्यात उपचार घेणाऱ्या बहुतांश नागरिकांची आर्थिक परिस्थिती नाजूक असते. खासगी रुग्णालयाचा खर्च त्यांना परवडणारा नसतो, त्यामुळे ससूनमध्ये आयसीयूत बेड उपलब्ध नसेल तर पैशाची जुळवाजुळव करताना रुग्णाच्या नातेवाइकाची चांगलीच दमछाक होते.

गेल्या १० वर्षांत हा आयसीयू सुरू करण्यासाठी अनेकदा चर्चा करण्यात आली. पण प्रत्यक्ष सुरवात झाली नाही.
कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या काळात महापालिकेच्या आरोग्य सुविधा अपुऱ्या असल्याचे समोर आले. या काळात कमला नेहरू रुग्णालयातील सतरा बेडचे आयसीयू सुरू झाला असता तर नागरिकांना फायदा झाला असता, दुसऱ्या लाटेतही हे आयसीयू सुरू होऊ शकले नाही. आता कोरोनाची तिसरी लाट सुरू झालेली असली तरी
आयसीयूचे काम स्थापत्य व विद्युत विषयक कामातच अडकून पडले आहे.

महाविद्यालयासाठी आयसीयू आवश्यक

पुणे महापालिकेतर्फे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. त्यासाठी कमला नेहरू रुग्णालयात वर्ग भरणार आहेत. तसेच या ठिकाणी असणारे आयसीयू या वैद्यकीय महाविद्यालय सहभाग असणार आहे. एकीकडे पुणे महापालिकेने वैद्यकीय महाविद्यालयासाठी जोडलेला असताना अद्याप आयसीयू सुरू झालेला नाही. हा आयसीयू सुरू करण्यासाठी अधिकारी, पदाधिकारी यांच्या वारंवार भेटी झालेल्या आहेत. आवश्यकतेनुसार गेल्या तीनचार वेळा साहित्य खरेदी झाली पण आयसीयू सुरू झाला नाही.


एसीसाठी ३४ लाख मंजूर
कमला नेहरू रुग्णालयात महापालिकेचा आयसीयू तयार करण्याचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक असणारी वातानुकूलित यंत्रणा बसविण्यासाठी स्थायी समितीने सुमारे ३४ लाख १५ हजार रुपयांच्या निविदेला मंगळवारी (ता. ११) मान्यता दिली.

कोट
"कमला नेहरू रुग्णालयात १७ बेडचे आयसीयू सुरू केले जाणार आहे. त्यासाठी भवन विभागातर्फे आवश्यक कामे केली जात आहेत. हे काम केल्यानंतर आयसीयूसाठी आवश्यक असणारी उपकरणे घेतील जातील.""
- डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, महापालिका

कोट

"आयसीयू सुरू करण्यासाठी सर्व गोष्टींची व्यवहार्यता तपासली जात आहे. काही तांत्रिक गोष्टींमुळे हा विषय पुढे जात आहे. "
गणेश बीडकर, सभागृह नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com