मुलांच्या लसीकरणावर
उद्या मोफत मार्गदर्शन

मुलांच्या लसीकरणावर उद्या मोफत मार्गदर्शन

मुलांच्या लसीकरणाविषयी वेबिनार पुणे, ता. १३ : १५ ते १८ वयोगटातील मुलांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळ माध्यम समूहातील ‘सकाळ सोशल फाऊंडेशन’च्या ‘वुई आर इन धिस टुगेदर’ (we are in this together) या मोहिमेंतर्गत ‘कोरोना व मुलांचे लसीकरण’ याविषयी मुले आणि पालकांसाठी शनिवारी (ता. १५) सायंकाळी ५ वाजता झूम वेबिनारचे मोफत आयोजन करण्यात आले आहे. बालरोगतज्ज्ञ व महाराष्ट्राच्या बाल-कोविड समितीचे सदस्य डॉ. प्रमोद जोग हे या वेळी मार्गदर्शन करणार आहेत. मुलांच्या लसीकरणाचे महत्त्व, त्यांच्या लसीकरणाविषयी पालकांच्या मनातील भीती व गैरसमज, कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुलांचे लसीकरण होणे गरजेचे का आहे, कोरोना व मानसिक आरोग्य आदींबाबत या वेळी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सहभागी होण्यासाठी... वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी पुढील लिंक ओपन करून रजिस्ट्रेशन करावे. त्यानंतर आपल्या ई-मेल आयडीवर झूम लिंक व पासवर्ड मिळेल. लिंक : https://tinyurl.com/2p9e5vmj

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com