
महिलांविषयी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एकजुटीने काम करा : डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे, ता. १ : ‘‘महिलांसाठी अनेक चांगले कायदे झाले आहेत. त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी सगळ्यांनी एक जुटीने काम करावे. तसेच राज्य महिला आयोगाच्या सदस्यांनी शक्य त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन महिलांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी काम करावे’’, असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी मुंबई येथील शिवसेना व युवा सेनेच्या कार्यकारिणी सदस्य सुप्रदा फातर्फेकर आणि बीडच्या शिवसेना महिला जिल्हा संघटक ॲड. संगीता चव्हाण यांची राज्य सरकारने नुकतीच नियुक्ती केली. त्यानिमित्ताने त्यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी फातर्फेकर आणि चव्हाण यांनी आयोगाच्या कामकाजाबद्दलच्या डॉ. गोऱ्हे यांच्या सूचना समजावून घेतल्या. तसेच धोरणात्मक मुद्यांवर अंमलबजावणीबाबत विधानपरिषदेच्या उपसभापती या नात्याने जे सहकार्य लागेल, ते राज्य महिला आयोग करेल, असे आश्वासन गोऱ्हे यांनी दिले. यावेळी पुणे शिवसेना महिला आघाडीच्या नवनिर्वाचित महिला शहर संघटक सविता मते, संगीता ठोसर, पल्लवी जावळे उपस्थित होत्या.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..