पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी कोरोना रोखला वेशीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 corona free
पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी कोरोना रोखला वेशीवर

पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी कोरोना रोखला वेशीवर

पुणे : पुणे जिल्ह्यातील ४४ गावांनी राज्यात कोरोनाचा (Corona)पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंतच्या सुमारे पावणे दोन वर्षांच्या कालावधीत कोरोना विषाणूला वेशीवरच रोखून धरले आहे. या सर्व गावांमध्ये आतापर्यंत कोरोनाच्या एकाही रुग्णाची नोंद झालेली नाही. खऱ्या अर्थाने ही गावे कोरोनामुक्तीत पुणे जिल्ह्यात(Pune District) यशवंत ठरली आहे. यामध्ये भोर तालुक्यातील सर्वाधिक १७ गावांचा समावेश आहे. पुरंदर तालुक्यातील एकमेव गावाने यात स्थान पटकावले आहे. राज्यातील पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० ला पुणे शहरात सापडला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच १० मार्चला जिल्ह्याच्या ग्रामीण ग्रामीण भागातील पहिला कोरोना रुग्ण नोंदला गेला होता.(Pune district 44 villages are corona Free)

तेव्हापासून आजअखेरपर्यंत (ता. १३ जानेवारी) या गावांमध्ये एकही कोरोना रुग्ण आढळून आलेला नाही. एकही रुग्ण न सापडलेल्यांमध्ये आंबेगाव, भोर, खेड, पुरंदर आणि वेल्हे या पाच तालुक्यांतील गावांचा समावेश असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरुवारी (ता. १३) सांगितले. कोरोनाला वेशीवर रोखण्यात यशवंत ठरलेली तालुकानिहाय गावे पुढीलप्रमाणे : मेघोली, म्हाळुंगे, कुसरिक, अगाणे, वर्सावणे, आपटी, कोलतावडे (सर्व ता. आंबेगाव), कुडापणेवाडी, वाव्हेघर, शिवनागरी, पऱ्हार खुर्द, पऱ्हार बुद्रुक, माझेरी, धानवली, कुडली खुर्द, हिर्डोशी, वारवंड, अभिपुरी, शिळींब, डेरे, बांद्रावली, खुलाशी, बोपे, डेहाण (सर्व ता. भोर), कोहिंडे खुर्द, खारवली, तोरणे खुर्द, आढे, येणवे खुर्द, पारासूळ, खरपूड, माजगाव, वेल्हावळे, माळवाडी-ठाकरवाडी (सर्व ता. खेड), बहिरवाडी (ता.पुरंदर), गिवशी, गोडेखल, घोळ, हरपूड, कोशिमघर, खरीव, मेटपिलावरे, टेकपोळे आणि वडघर.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top