
शाओमी इंडियाचे सर्व सेवा विनंतीसाठी ‘एक-थांबा सोल्यूशन शाओमी सर्विस अॅप’
पुणे, ता. ३१ : शाओमी इंडिया या स्मार्टफोन व स्मार्ट टीव्ही ब्रॅण्डने ग्राहकांच्या सर्व विक्री-पश्चात आवश्यकतांची पूर्तता करणारे ‘एक-थांबा अॅप शाओमी सर्विस प्लस’च्या लॉंचची घोषणा केली. विक्री-पश्चात सेवा देण्यासाठी शाओमीची कटिबद्धता कायम राखत शाओमी सुविधेसह डिव्हाईस दुरुस्ती, प्राइस क्वोटेशन, लाइव्ह चॅट आणि इतर सुविधा देते. ग्राहक घरबसल्या या सर्व सेवांचा लाभ घेऊ शकतात.
शाओमी सर्विस प्लस ग्राहकांनी उत्पादन खरेदी केल्यानंतर ब्रॅण्डचे त्यांच्यासोबतचे प्रबळ नाते कायम राहण्यासाठी डिझाइन केले आहे. हे अॅप सर्व शाओमी डिवाईसेस, इन्स्टॉलेशन व प्रात्यक्षिकांसाठी दुरुस्ती विनंती नोंद करू शकते. हे अॅप आऊटरिच सर्विसेससाठी जवळचे सर्विस सेंटर शोधण्यासाठी वापरता येऊ शकते. युजर्स स्पेअर पार्ट किमतीच्या कोटेशन्ससाठी विनंती करू शकतात, तसेच त्यांच्या खरेदी केलेल्या डिव्हाइसेसची वॉरंटी माहिती पाहू शकतात.
शाओमी सर्विस प्लसच्या लॉंचप्रसंगी बोलताना शाओमी इंडियाचे सीओओ मुरलीकृष्णन बी. म्हणाले, ‘‘शाओमीमध्ये आम्ही डिव्हाइसच्या खरेदीपलीकडे राहणारे नाते निर्माण करण्याप्रती काम करतो. शाओमी सर्विस प्लस अॅपच्या लाँचमधून प्रत्येक ग्राहकाला जलदपणे समस्येचे निराकरण व सोल्यूशन वितरणासाठी विक्री-पश्चात सेवा देण्यासाठी असलेली आमची कटिबद्धता दिसून येते. शाओमी सर्विस प्लस युजरचा विक्री-पश्चात सेवा अनुभव द्विगुणित करण्यामधील आधारस्तंभ आहे. शाओमी सर्विस प्लस अॅपच्या युजर्सना काही क्लिक्समध्येच माहिती देण्याचा मनसुबा आहे. हे अॅप गुगल प्ले किंवा गेटॅप्सच्या माध्यमातून डाऊनलोड करता येऊ शकते. देशातील सर्वात मोठे नेटवर्क असलेल्या शाओमी इंडियाच्या जवळपास दोन हजार सर्विस सेंटर्सचे पाठबळ आहे. हे सेंटर्स आयएसओ प्रमाणित आहेत.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..