
फोनपे पल्सकडून चौथ्या त्रैमासिकातील डिजिटल पेमेंटचे ट्रेंड्स जारी
पुणे, ता. ३१ : फोनपे पल्सकडून चौथ्या त्रैमासिकातील डिजिटल पेमेंटचे ट्रेंड्स जारी करण्यात आले आहेत. तिसऱ्या त्रैमासिकात भारतीयांचा डिजिटल पेमेंट करण्याचा कल वाढल्याचे दिसून आले. तोच कल चौथ्या त्रैमासिकात सुद्धा कायम असल्याचे दिसून आले. देशातील ७२६ पैकी ७२२ जिल्ह्यात नोंदणीकृत युजर्स आणि डिजिटल व्यवहारांच्या संख्येत सकारात्मक वाढीची नोंद झाली आहे.
मागील त्रैमासिकाच्या तुलनेत या त्रैमासिकातील व्यवहारांच्या वाढीच्या संदर्भात भौगोलिकदृष्ट्या, गोवा, अंदमान, आसाम ही पहिली तीन आघाडीवरील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश होती. महाराष्ट्राने २७ टक्के वाढ नोंदवली आणि एका त्रैमासिकात सुमारे एक अब्ज व्यवहार (१.०१ बिलियन) पार करणारे ते पहिले राज्य बनले. कर्नाटक राज्य २४ टक्के वाढीसह दुसऱ्या स्थानावर होते.
२०२१ वर्षातील चौथ्या त्रैमासिकाचा पल्सचा रिपोर्ट जारी करताना, फोनपेचे स्ट्रॅटेजी आणि इन्व्हेस्टर रिलेशनचे प्रमुख कार्तिक रघुपार्थी म्हणाले, ‘‘जसे आम्ही तिसऱ्या त्रैमासिकाचा अहवाल जारी करताना अंदाज व्यक्त केला होता. त्याप्रमाणे सुटीचा हंगाम, सण आणि एकाधिक ई-कॉमर्स सेल यामुळे व्यापारी व्यवहारांत मागील त्रैमासिकाच्या तुलनेत मजबूत वाढ नोंदवली गेली. पल्सचा डेटा स्पष्टपणे सूचित करतो की, कॉन्टॅक्टलेस पेमेंट्ससाठी ग्राहकांच्या वर्तनात दिसलेला मूलभूत बदल कायम राहिला. डिजिटल पेमेंट ही ग्राहक आणि व्यापारी या दोघांसाठी एक अंगभूत सवय बनली आहे. त्यामुळे, आम्ही २०२२ मध्येही याच्या वापरात वाढ होइल, अशी अपेक्षा आहे.’’
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..