Building Construction
Building Constructionsakal

पुणे महापालिका हद्दीतील बांधकामे सरसकट नियमित नाहीत

महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे.
Summary

महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे.

पुणे - महापालिकेची (Pune Municipal) परवानगी (Permission) पाच मजल्यांसाठी आहे. प्रत्यक्षात जागेवर नऊ मजली बांधकाम (Construction) केले आहे. तर अशा इमारतीतील उर्वरित मजले गुंठेवारी कायद्यांतर्गत (Gunthewari Law) नियमित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शुल्क (Fee) भरावे लागणार आहे. तसेच युडीसीपीआर (एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहनपर नियमावली) (UDCPR) मधील वाढीव ‘एफएसआयनुसार’च अशी बांधकामे नियमित (Regular) होणार आहे. याचा अर्थ सरसकट बांधकामे नियमित होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

महापालिकेने गुंठेवारी कायद्यांतर्गत घरे नियमित करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी महापालिकेकडून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. त्यामध्ये मान्य एफएसआय १.१० वापरून जी बांधकामे झाली आहेत. तीच बांधकामे नियमित करण्यात येणार आहे. पेक्षा अधिक एफएसआय वापरून बांधकाम केले असेल, तर डिसेंबर २०२० मध्ये राज्य सरकारने मान्यता दिलेल्या ‘युडीसीपीआर’मधील तरतुदीनुसार बांधकाम नियमित करण्यात येईल, असे म्हटले आहे. त्यामुळे मान्य एफएसआय व्यतिरिक्त केलेले बांधकाम नियमित करण्यासाठी संबंधितांना नऊ मीटर रुंदीच्यावरील रस्त्यावर बांधकाम असेल, तर प्रिमिअम एफएसआय, अन्सलरी एफएसआय आणि टीडीआर वापर करून वरील बांधकाम नियमित करता येणार आहे, मात्र त्यासाठी देखील काही अटी आहेत.

नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावरील बांधकामांना टीडीआर अथवा प्रिमिअम एफएसआय वापरता येणार नाही. केवळ अन्सलरी एफएसआय विचारात घेऊन बांधकामे नियमित होणार आहे. म्हणजे नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यावर बांधकाम केले असेल, तर ते मान्य एफएसआय १.१० आणि त्यावर साठ टक्के अन्सलरी एफएसआय म्हणजे १.७० एफएसआयपर्यंतचेच बांधकामे नियमित होणार आहे. परंतु अन्सलरी एफएसआय वापरण्यासाठी जमिनींच्या रेडी-रेकनरमधील दराच्या १५ टक्के शुल्क भरावे लागणार आहे.

Building Construction
मोबाईल गेम खेळणाऱ्यांच्या संख्येत पुणे देशात तिसऱ्या क्रमांकाचे शहर

‘त्यांना’ देखील हा नियम लागू

पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर गुंठेवारीची घरे आणि इमारती झाल्या आहेत. त्यापैकी ऐंशी टक्के इमारती या नऊ मीटर रुंदीच्या आतील रस्त्यांवर झाल्या आहेत. तसेच दोन गुंठे जागेवर पाच आणि सहापर्यंत एफसआय वापरण्यात आले आहे. अशी बांधकामे नियमित होण्यासाठी यामुळे अनेक मर्यादा येणार आहेत. काही मजल्यापर्यंत महापालिका अथवा कलेक्टर मान्य ले-आऊटपेक्षा अधिक बांधकामे केले आहेत. त्यांना देखील हा नियम लागू राहणार आहे.

१५ टक्के दराने शुल्क भरावे लागणार

नऊ मीटर रुंदीच्या वरील गुंठेवारीच्या बांधकामांसाठी टीडीआर २० टक्केच वापरण्यास परवानगी आहे. तर प्रिमिअम एफएसआय वापराचा असेल, तर जागेच्या एकूण क्षेत्रफळाच्या पन्नास टक्केच वापरता येईल. त्यासाठी जमिनींचे रेडी-रेकनर मधील दराच्या ३५ टक्के दराने शुल्क भरावे लागणार आहे. तर अन्सलरी एफएसआयसाठी जमिनीच्या रेडी-रेकनर मधील दराच्या १५ टक्के दराने शुल्क भरावे लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com