पुणे, मुंबईनंतर सांगलीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे, मुंबईनंतर सांगलीत 
ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण
पुणे, मुंबईनंतर सांगलीत ओमिक्राँनचे सर्वाधिक रुग्ण

पुणे, मुंबईनंतर सांगलीत ओमिक्रॉनचे सर्वाधिक रुग्ण

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : राज्यात ओमिक्रॉन या कोरोनच्या नवीन व्हेरियंटेच २०७ रुग्ण नव्याने आढळले आहेत. त्यात आतापर्यंत प्रथमच मुंबई आणि पुणे ही दोन शहरे वगळता सर्वाधिक रुग्ण सांगलीमध्ये नोंदले गेले. सांगलीमध्ये ५७, मुंबईत ४० आणि पुणे महापालिकेत २२ रुग्णांची नोंद झाली.

राज्यातील २०७ जणांना ओमिक्रॉनचा संसर्ग झाला. त्यापैकी १५५ रुग्णांचे अहवाल पुण्याच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयांनी दिले. तर, उर्वरित ५२ रुग्णांचे अहवाल राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) दिले. त्यात राज्यात सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण सांगलीमध्ये आढळले आहेत. तेथे ५७ रुग्णांना ओमिक्राँनचा संसर्ग झाल्याचे जनुकीय क्रमनिर्धारणावरून (जिनोम सिक्वेंसिंग) स्पष्ट झाले.

नव्याने आढळलेले ओमिक्रॉनचे रुग्ण
सांगली ....... ५७
मुंबई ....... ४०
पुणे मनपा ....... २२
नागपूर ....... २१
पिंपरी-चिंचवड ....... १५
ठाणे मनपा ....... १२
कोल्हापूर ....... ८
अमरावती ....... ६
उस्मानाबाद ....... ५
बुलढाणा आणि अकोला ....... प्रत्येकी ४
गोंदिया ....... ३
नंदुरबार सातारा आणि गडचिरोली ....... प्रत्येकी २
औरंगाबाद जालना लातूर आणि मीरा भाईंदर ....... प्रत्येकी १
....................
राज्यात आतापर्यंत निदान झालेले ओमिक्रॉनचे रुग्ण
जिल्हा /मनपा ................ आढळलेले ओमिक्रॉनचे रुग्ण
मुंबई ................ ६०६
पुणे मनपा ................ २२३
पिंपरी चिंचवड ................ ६८
सांगली ................ ५९
नागपूर ................ ५१
ठाणे मनपा ................ ४८
पुणे ग्रामीण ................ ३२
कोल्हापूर ................ १८
पनवेल ................ १७
उस्मानाबाद ................ ११
नवी मुंबई आणि सातारा ................ प्रत्येकी १०
अमरावती ................ ९
कल्याण डोंबिवली................ ७
बुलढाणा आणि वसई विरार................ प्रत्येकी ६
भिवंडी निजामपूर मनपा आणि, अकोला ................ प्रत्येकी ५
नांदेड,उल्हासनगर, औरंगाबाद , मीरा भाईंदर आणि गोंदिया ................ प्रत्येकी ३
अहमदनगर, गडचिरोली, लातूरआणि नंदुरबार ................ प्रत्येकी २
जालना आणि रायगड ................ प्रत्येकी १

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top