ज्येष्ठ नागरिक ‘बुस्टर’पासून वंचित
ससून रुग्णालयाच्या केंद्रावरील चित्र; लशीची नोंद लांबल्याचा फटका

ज्येष्ठ नागरिक ‘बुस्टर’पासून वंचित ससून रुग्णालयाच्या केंद्रावरील चित्र; लशीची नोंद लांबल्याचा फटका

पुणे, ता. १० : आम्ही १ मार्च २०२१ रोजी ससून रुग्णालयातील लसीकरण केंद्रावर लस घेतली. दुसरा डोस २८ दिवसांनी तिथेच घेतला. रुग्णालयाने पहिल्या डोसची नोंद एप्रिलमध्ये आणि दुसऱ्या डोसची नोंद ऑगस्टमध्ये केली. लस घेऊन आता नऊ महिने झाले, तरीही कागदोपत्री मात्र पाच महिनेच झाल्याचे दिसतात. त्यामुळे आम्हाला बूस्टर डोस मिळत नाही, यात आमची काय चूक, असा सवाल सुजाता पटवर्धन यांची उपस्थित केला आहे.

शहरात सहव्याधी असलेल्या आणि वयाची साठी ओलांडलेल्यांना सोमवारपासून कोरोना प्रतिबंधक लशीचा ‘बूस्टर डोस’ (प्रिकॉशनरी डोस) द्यायला सुरुवात झाली. यापूर्वी गेल्या वर्षी १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले. त्यासाठी कोव्हिन संकेतस्थळावर नोंदणी आवश्यक होती. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून मार्च आणि एप्रिलमध्ये लस घेतलेल्या आणि सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्यासाठी सोमवारी लसीकरण केंद्रावर हजेरी लावली. यापैकी काहींनी मार्च, तर काहींनी एप्रिलमध्ये लस घेतली होती. मात्र, त्यांची ‘कोव्हिन’वर नोंदणी उशिरा झाली. त्यामुळे त्यांना या डोसपासून वंचित रहावे लागले. त्यांना दुसऱ्या डोसला नऊ महिने झाल्यानंतर लस मिळेल, असे लसीकरण केंद्रावरील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी ससून रुग्णालयात जाऊ लस घेतली होती. मात्र, तेथील कर्मचाऱ्यांनी वेळेत नोंदणी केली नाही. वारंवार पाठपुरावा केल्यानंतर पहिल्या डोसची नोंद एप्रिलमध्ये केली. तर, दुसऱ्या डोसच्या नोंदीसाठी ऑगस्ट उजाडला. त्याचा फटका आता आम्हाला बसत आहे. सहव्याधि असूनही आम्हाला बूस्टर डोस घेण्यासाठी अजून चार महिने वाट बघावी लागणार आहे.
-सुजाता पटवर्धन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com