पुण्यातील पेठांमध्ये कमी दाबाने पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यातील पेठांमध्ये कमी दाबाने पाणी
पुण्यातील पेठांमध्ये कमी दाबाने पाणी

पुण्यातील पेठांमध्ये कमी दाबाने पाणी

sakal_logo
By

पुणे, ता. १३ : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम करण्यात येणार असल्याने सर्व पेठांसह इतर भागांतील पाणीपुरवठा १६ ते २१ जानेवारी या काळात कमी दाबाने होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्पष्ट केले आहे.

समान पाणीपुरवठा योजनेसाठी शहरात अनेक ठिकाणी जलवाहिनी टाकण्याचे काम केले जात आहे. सर्व पेठा, शिवाजीनगर, डेक्कनसह इतर भागांत पाणीपुरवठा करण्यासाठी महत्त्वाची असणारी जलवाहिनी टाकली जात आहे. त्यासाठी पर्वती जलकेंद्राच्या एलएलआर टाकीला जोडणारी मुख्य जलवाहिनी टाकणे व इतर जलवाहिनी जोडणे अशी कामे या काळात रात्री १० ते पहाटे ३.३० या वेळेत केले जाणार आहे. दिवसा या भागात पाणीपुरवठा केला जाणार असला, तरी पाण्याचा दाब कमी असू शकतो, त्यामुळे काही भागांत पाणीटंचाई निर्माण होऊ शकते.

या भागांत होईल कमी दाबाने पाणीपुरवठा : सर्व पेठा, डेक्कन, शिवाजीनगर, भवानी पेठ, नाना पेठ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top