
प्रारूप प्रभाग रचना उघड
पुणे, ता. ३० : पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची उत्सुकता ताणली गेलेली असतानाच सोमवारी (ता. ३१) पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रारूप प्रभाग रचनेच्या ५८ प्रभागांची नावे जाहीर झाली. ही नावे व्हायरल होताच प्रचंड गोंधळ निर्माण झाल्याने काही वेळाने ही नावे हटविण्यात आली. मात्र, प्रभागांच्या नावावरून प्रस्थापित नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे प्रभाग राखले आहेत. तर प्रभागांच्या तोडफोडीमध्ये अनेक विद्यमान नगरसेवकांना झटका बसल्याची चर्चा महापालिकेत आहे.
निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेला १ फेब्रुवारी रोजी प्रारूप आराखडा जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे महापालिकेची प्रभाग रचना ही वादाची तसेच डावपेचांची झालेली आहे. निवडणूक आयोगाने २४ बदल करायला सांगितल्यानंतर पुन्हा १२ ठिकाणी महत्त्वाचे बदल करण्यात आले. त्यामुळे अनेक प्रस्थापितांना दिलासा मिळाल्याची चर्चा आहे. राज्यात सर्वांत अवघड व डोक्याला ताप करणारी प्रभाग रचना ही पुण्याची ठरली असून, शेवटच्या क्षणापर्यंत बदल सुचविले जात होते असे अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले. त्यातच सोमवारी दुपारी महापालिकेच्या संकेतस्थळावर १ ते ५८ प्रभागांची नावे जाहीर झाली. तर नकाशे टाकण्यात आलेले नव्हते. पण ही माहिती संकेतस्थळावर आल्याची माहिती समोर येताच प्रशासनाने ही यादी काढून घेतली. दरम्यान, या संकेतस्थळाची लिंक व फोटो उपलब्ध झाले आहेत.
महापालिच्या संकेतस्थळारील माहितीनुसार प्रभागांची पुढील प्रमाणे
प्रभाग क्रमांक १ धानोरी–विश्रांतवाडी
२ टिंगरेनगर–संजय पार्क
३ लोहगाव-विमान नगर
४ वाघोली-इऑन आयटी पार्क
५ खराडी-चंदननगर
६ वडगावशेरी
७ कल्याणीनगर-नागपूर चाळ
८ कळस-फुलेनगर
९ येरवडा
१० शिवाजीनगर गावठाण-संगमवाडी
११ बोपोडी-पुणे विद्यापीठ
१२ औंध-बालेवाडी
१३ बाणेर-सुस म्हाळुंगे
१४ पाषाण-बावधन बुद्रूक
१५ पंचवटी-गोखलेनगर
१६ फर्ग्युसन महाविद्यालय-एरंडवणे
१७ शनिवार पेठ-राजेंद्रनगर
१८ शनिवार वाडा-कसबा पेठ
१९ रास्तापेठ-के.ई.एम. हॉस्पिटल
२० पुणे स्टेशन-ताडीवाला रस्ता
२१ मुंढवा-घोरपडी
२२ मांजरी-शेवाळवाडी
२३ साडेसतरानळी-आकाशवाणी
२४ मगरपट्टा-साधना विद्यालय
२५ हडपसर गावठाण-सातववाडी
२६ भीमनगर-रामटेकडी
२७ कासेवाडी-हरकानगर
२८ महात्मा फुले स्मारक-टिंबर मार्केट
२९ खडकमाळ आळी-महात्मा फुले मंडई
३० जयभवानी नगर-केळेवाडी
३१ कोथरूड गावठाण-शिवतीर्थ नगर
३२ भुसारी कॉलनी- सुतारदरा
३३ बावधन खुर्द-महात्मा सोसायटी
३४ वारजे-कोंढवे धावडे
३५ रामनगर-उत्तमनगर शिवणे
३६ कर्वेनगर
३७ जनता वसाहत-दत्तवाडी
३८ शिवदर्शन- पद्मावती
३९ मार्केटयार्ड-महर्षी नगर
४० गंगाधाम-सॅलिसबरी पार्क
४१कोंढवा खुर्द-मिठानगर
४२ सय्यदनगर-लुल्लानगर
४३ वानवडी-कौसरबाग
४४ काळेपडळ-ससाणेनगर
४५ फुरसुंगी
४६ मोहम्मदवाडी-उरुळी देवाची
४७ कोंढवा बुद्रूक-येवलेवाडी
४८ अप्पर सुपर इंदिरानगर
४९ बालाजीनगर-के. के. मार्केट
५० सहकारनगर-तळजाई
५१ वडगाव-पाचगाव पर्वती
५२ नांदेड सिटी-सनसिटी
५३ खडकवासला-नऱ्हे
५४ धायरी-आंबेगाव
५५ धनकवडी-आंबेगाव पठार
५६ चैतन्यनगर-भारती विद्यापीठ
५७ सुखसागर नगर-राजीव गांधी नगर
५८ कात्रज-गोकुळनगर
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..