Pune Ward Structure Map
Pune Ward Structure MapSakal

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना मंगळवारी होणार जाहीर

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत.
Summary

पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभागरचना १ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत.

पुणे - पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Pune Municipal Election) प्रारूप प्रभागरचना (Ward Structure) १ फेब्रुवारी रोजी जाहीर केली जाणार असून १ ते १४ फेब्रुवारी या कालावधीत त्यावर हरकती सूचना मागविण्यात येणार आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांना यासंदर्भात पत्र पाठविले असून, महापालिकेने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेला मान्यता दिल्याचे स्पष्ट केले आहे.

महापालिकेने २० जानेवारी रोजी निवडणूक आयोगाने सुचविलेल्या २४ बदलांसह तयार केलेला सुधारित आराखडा आयोगाला सादर केला. त्यानंतर आठवड्याभरात आयोगाकडून प्रारूप आराखडा जाहीर करणे, हरकती सूचना मागवून त्यावर सुनावणी घेणे याचा कार्यक्रम जाहीर करेल असा अंदाज वर्तविला होता. आयोगाने दोन दिवसांपूर्वी काढलेल्या आदेशात आधी प्रभाग रचना निश्‍चीत होईल व सर्वांत शेवटी आरक्षणांसाठी सोडत काढली जाईल असे स्पष्ट केले आहे. त्यानंतर २८ जानेवारीलाच पुणे महापालिकेला प्रभागरचना मंजूर झाल्याचे पत्र पाठविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड व इतर महापालिकांना पत्र मिळाल्याने पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चौकशी करणारे अनेक फोन गेले, परंतु पुणे महापालिकेला प्रारूप आराखडा मंजूर झाल्याचे पत्र मिळाले नसल्याचे सांगण्यात आले होते.

Pune Ward Structure Map
पुण्यात माजी नगरसेवकाची ज्येष्ठ नागरिकाला बेदम मारहाण

दरम्यान, पुणे महापालिकेला प्रारूप प्रभागरचना मंजूर केल्याचे पत्र मिळाले असून, यामध्ये १ फेब्रुवारीला सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना जाहीर करावी, १ ते १४ फेब्रुवारी दरम्यान हरकती सूचना मागविण्यात याव्यात, १६ फेब्रुवारी रोजी प्राप्त झालेल्या हरकती सूचनांचे विवरण पत्र सादर करावे, २६ फेब्रुवारी पर्यंत हरकती सूचनांवर सुनावणी घ्यावी, सुनावणी नंतर २ मार्चपर्यंत प्राधिकृत अधिकार्यांने केलेल्या शिफारशीनुसार निवडणूक आयोगाला पाठवावे, असे आदेशात नमूद केले आहे.

सरासरी प्रभाग ६१ हजारांचा

- निवडणुकीत ३ सदस्यांचे ५७ तर २ सदस्यांचा एक असे ५८ प्रभाग असणार

- प्रभाग क्रमांक १३ हा दोन सदस्यांचा असणार

- तीन सदस्यांच्या प्रभागाची सरासरी लोकसंख्या ६१ हजार ६७९ असणार

- सर्वांत मोठा प्रभाव ६७ हजार ८४७ लोकसंख्येचा

- सर्वांत लहान ५५ हजार ५११ लोकसंख्येचा

- एकूण १७३ जणांपैकी १४८ जागा खुल्या गटासाठी

- २३ अनुसूचित जाती, २ अनुसूचित जमातीसी आरक्षित

- १७३ पैकी ८७ जागा महिलांसाठी आरक्षित (त्यामध्ये १२ अनुसूचित जाती, १ अनुसूचित जमाती)

- ७४ जागा खुल्या गटातील महिलांसाठी

- प्रभागरचना अंतिम झाल्यावर आरक्षणासाठी सोडत काढली जाणार आहे.

- कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण असणार हे गुलदस्तात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com