
कारच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, तर सहप्रवासी तरुण जखमी
पुणे, ता. १४ : भरधाव दुचाकी दुसऱ्या वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असताना समोरून आलेल्या कारची जबर धडक बसल्याने दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला, तर सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास वडकी परिसरात घडली.
अनुज जगन्नाथ आंबेकर (वय १८, पापडेवस्ती, फुरसुंगी) याचा अपघातात मृत्यू झाला, तर सहप्रवासी श्रेयश संजय खरात (वय १८, रा. फुरसुंगी) हा जखमी झाला. श्रेयस सुखरूप असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अनुज व श्रेयस हे महाविद्यालयीन विद्यार्थी असून, एकमेकांचे मित्र आहेत. ७ एप्रिल रोजी ते त्यांच्या महाविद्यालयातील कार्यक्रम संपवून घरी येत होते. वडकीच्या रस्त्यावरून जात असताना, त्यांच्या दुचाकीने एका वाहनाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एका कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने अनुजचा मृत्यू झाला, तर श्रेयस गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार सुरू असून प्रकृतीमध्ये सुधारणा होत असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..