ऑनलाइन परीक्षेला ८० टक्के पसंती 
राज्सातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेकडून सर्वेक्षण
Esakal

ऑनलाइन परीक्षेला ८० टक्के पसंती राज्सातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेकडून सर्वेक्षण

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेबाबत मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने एक सर्वेक्षण केले.
Summary

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेबाबत मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने एक सर्वेक्षण केले.

पिंपरी - एकीकडे दहावी, (SSC) बारावी बोर्डाच्या परीक्षा (HSC Board Exam) या नियोजित वेळापत्रकानुसार एप्रिल - मे २०२२ मध्ये होणार असून, त्या ऑफलाइन पद्धतीने (Offline Process) होणार असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले. मात्र, त्याच दरम्यान राज्यातील ८० टक्के विद्यार्थ्यांनी (Students) बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने (Online Process) व्हावी, असे मत एका सर्वेक्षणात (Survey) मांडले आहे. ऑनलाइन शिकताना अभ्यासक्रम समजला नसल्याचे ७०.३ टक्के विद्यार्थ्यांनी मत नोंदविले आहे. त्यामुळे राज्य मंडळाला परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या अशा अनेक प्रश्‍न आणि त्याबाबतचे मत सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांकडून परीक्षेबाबत मत जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटनेने एक सर्वेक्षण केले. यात विद्यार्थ्यांना नेमके काय वाटते, हे जाणून घेण्याच्या उद्देशाने संघटनेचे अध्यक्ष अनिश काळभोर, उपाध्‍यक्ष अनुराग पाटील, विद्यार्थी प्रमुख अनुपम कुंभार, राज्य सचिव ओंकार घोळवे, राज्य सचिव प्रज्वल खुटाळ यांनी सर्वेक्षण करण्याचे ठरवले. कोरोना काळातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी ही संघटना काम करत आहे. यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोचण्यासाठी संघटनेने राज्यातील ३६ जिल्ह्यांपर्यंत गुगल फॉर्म पोहोचून हे सर्वेक्षण पूर्ण केले.

ऑनलाइन परीक्षेला ८० टक्के पसंती 
राज्सातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेकडून सर्वेक्षण
पुणे : पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग येत्या सोमवारपासून पूर्णवेळ सुरु

या सर्वेक्षणात ३ लाख ५० हजार विद्यार्थ्यांच्या सध्याच्या कोरोना परिस्थितीचा विचार करता मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये बोर्ड परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, यासाठी ८०. ६ टक्के विद्यार्थ्यांनी संमती दर्शवलीये तर १९.४ टक्के जणांनी ऑफलाइन परीक्षेची मागणी केली आहे. तर ६९.२ टक्के विद्यार्थ्यांनी ‘एमसीक्यु’ पद्धतीने परीक्षा देण्यास तयार आहेत. या सर्वेक्षणमध्ये ऑनलाइन परीक्षेला एकीकडे पसंती दर्शवली आहे. तरीसुद्धा, अभ्यासक्रम पूर्ण न झाल्याने ७० टक्के विद्यार्थी बोर्ड परीक्षा न देण्याचा विचार करत आहेत. हे सर्वेक्षण जरी एकीकडे केले जात असले आणि विविध मागण्या बोर्ड परीक्षेबाबत समोर येत असल्या तरी शिक्षण विभागाने मात्र परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. शिवाय, पेपर पॅटर्न, अभ्यासक्रम सगळे आधीच ठरलेले असताना अचानक यामध्ये बदल करणे शक्य नसून त्यासाठी पुढे परिस्थिती पाहून शिक्षण तज्ज्ञांचा विचार घेतला जाणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या सर्वेक्षणाचा शिक्षण विभाग किती गांभीर्याने विचार करते, हे पाहावे लागणार आहे.

सर्वेक्षणातील निरीक्षणे

- बोर्ड परीक्षा कोणत्या पद्धतीने घेतली जावी?

- ८०.६ टक्के विद्यार्थ्यांच्या मते ऑनलाइन घेण्यात यावी.

- १९.४ टक्के विद्यार्थ्यांच्या मते ऑफलाइन घेण्यात यावी.

सद्यःस्थितीत ऑनलाइन शिक्षणाबद्दल मत काय आहे.?

- ७०.३ टक्के विद्यार्थांना अभ्यासक्रम समजलेला नाही.

- २९.७ टक्के विद्यार्थ्यांनी अभ्यास समजून घेण्यासाठी वाढीव वेळ मागितला आहे.

बॅचनिहाय ऑफलाइन परीक्षेबद्दल तुमचे मत काय?

- ७४.६टक्के विद्यार्थ्यांनी बॅचनिहाय ऑफलाइन परीक्षेबद्दल सकारात्‍मक मत मांडले आहे.

- २५.४ टक्के विद्यार्थ्यांनी नकारासाठी मतदान केले.

ऑनलाइन परीक्षेला ८० टक्के पसंती 
राज्सातील साडेतीन लाख विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र विद्यार्थी संघटनेकडून सर्वेक्षण
दहावी-बारावीच्या परीक्षांचे हॉलतिकीट कधी मिळणार ?

तुम्हाला ‘एमसीक्यु’पॅटर्न हवा आहे का?

- ६९.२ टक्के विद्यार्थ्यांच्या मते सद्यःस्थिती पाहता ‘एमसीक्यु’पॅटर्न राबवावा.

- ११.३ टक्के विद्यार्थ्यांनी ‘एमसीक्यु’पॅटर्न ला नकार दर्शविला आहे.

- १३.७ टक्के विद्यार्थ्यांनी ५०-५० मत दर्शविले आहे.

- ५.८ टक्के विद्यार्थ्यांनी झाले तर ठीक आहे, या पर्यायांची निवड केली.

- तर ८० टक्के विद्यार्थी वर्षभरात झालेल्या ऑनलाइन शिक्षणावर समाधानी नसल्याचे समोर आले आहे.

ऑफलाईन बोर्ड परीक्षा रद्द करा, या इंटरनेटवर सतत मागण्या केल्या जात आहेत, ज्याने ‘विद्यार्थी विरुद्ध बोर्ड’ अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हा मुद्दा सोशल मीडियावर ट्रेंड होत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही फूट पडत आहे. आम्ही समस्या आणि मागण्या चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे सर्वेक्षण केले आहे.

- अनिश काळभोर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विद्यार्थी संघटना.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com