
मन, मनगट व मेंदूचे ‘यशस्वीतेसाठी संतुलन गरजेचे
पुणे, ता. २८ ः ‘मन, मनगट व मेंदू यांचे संतुलन साधत कला, व्यायाम व अभ्यास साध्य करणारा आयुष्यात यशस्वी होतो’, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केले.
मराठवाडा मित्र मंडळाच्या वाणिज्य महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी बुद्धिबळपटू जयंत गोखले, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, संस्थेचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, प्राचार्य डॉ. देविदास गोल्हार उपस्थित होते. महाविद्यालयातील गुणवंत खेळाडू, विद्यार्थी आणि विशेष कामगिरी करणाऱ्या प्राध्यापकांचा सन्मान करण्यात आला.
जाधव म्हणाले, ‘‘गुणवत्ता यादीत विद्यार्थी यश मिळवतातच. पण अंधारात लपलेल्या किती विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रकाश आणता आला, यावर आम्ही आमच्या संस्थेचे यश मोजतो.’’ डॉ. गोल्हार यांनी महाविद्यालयाच्या वाटचालीची माहिती दिली. गोखले, कोळपकर यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. एम. आर. गायकवाड यांनी केले. डॉ. सुजाता शेणई व प्रा. सुपर्णा दास यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. स्वाती बर्वे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..