
रेल्वेला भंगार विक्रीतून ४४३ कोटी
पुणे, ता. २८ ः मध्य रेल्वेमधील प्रत्येक विभाग, कार्यशाळा आणि शेडमधील भंगार विक्रीस काढले आहे. रेल्वेचे विभाग भंगारमुक्त करण्यासाठी ‘झिरो स्क्रॅप’ मिशन सुरू केले आहे. या मिशनमध्ये पाच विभाग आणि इतर डेपोंमधील भंगार विक्रीचा उपक्रम हाती घेतला आहे. याचाच भाग म्हणून रेल्वेला भंगार विक्रीतून जानेवारी २०२१ ते फेब्रुवारी २०२२ पर्यंत भंगारातून ४४३.३५ कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. स्क्रॅप रूळ, पर्मनंट-वे सामग्री, वापर करण्यास अयोग्य डबे, वॅगन आणि लोकोमोटिव्ह आदींचा समावेश भंगार सामग्रीमध्ये आहे. गेल्या वर्षीचे उत्पन्न ३३६.७८ कोटी होते. यावर्षी या उत्पन्नात ३१.६५ टक्क्यांनी वाढ होत १०६.५७ कोटींचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी सांगितले की, भंगाराच्या विक्रीमुळे केवळ महसूल मिळत नाही, तर परिसराची चांगली देखभालही होत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..