वास्तुकला मराठी परिषद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वास्तुकला मराठी परिषद उत्साहात
वास्तुकला मराठी परिषद उत्साहात

वास्तुकला मराठी परिषद उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. १ : मराठी भाषादिनानिमित्त ‘राज्यस्तरीय वास्तुकला मराठी परिषद : २०२२’ नुकतीच पार पडली. भारतीय कला प्रसारिणी सभा व राज्य सरकारच्या तंत्र शिक्षण विभागातर्फे या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. नामवंत वास्तू विशारदांच्या अनुभवाचा इतरांनाही उपयोग व्हावा आणि ती माहिती मराठी भाषेत सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ही परिषद आयोजित केली होती.

परिषदेचे उद्घाटन सभेचे सचिव पुष्कराज पाठक यांच्या हस्ते झाले. ते म्हणाले, ‘‘या परिषदेच्या माध्यमातून राबविलेल्या जाणाऱ्या उपक्रमाचा फायदा वास्तुकलेच्या क्षेत्रात नव्याने सहभागी होणारे विद्यार्थी, नुकतेच उत्तीर्ण झालेले वास्तु विशारद व वास्तु कलेविषयी उत्सुकता असणाऱ्या सर्वांनाच होणार आहे.’’
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव या परिषदेला ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होत्या. संस्थेच्या वास्तुविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अभिजित नातू यांच्या संकल्पनेतून ही परिषद पार झाली. या परिषदेत एकूण चाळीस नामवंत वास्तु विशारदांनी विविध विषयांवर शोधनिबंध सादर केले. या वेळी वास्तुविशारद अरविंद पाठक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन डॉ. पराग नारखेडे व प्रा. प्रज्ञा पत्की यांनी केले. सूत्रसंचालन संजय सिंग यांनी केले.