हिंदू महिला सभेतर्फे शनिवारी महिलांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू महिला सभेतर्फे शनिवारी महिलांचा सन्मान
हिंदू महिला सभेतर्फे शनिवारी महिलांचा सन्मान

हिंदू महिला सभेतर्फे शनिवारी महिलांचा सन्मान

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः हिंदू महिला सभा, पुणे या संस्थेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शनिवारी (ता. ५) ‘अनवट वाटेवरच्या आम्ही’ या विषयाला अनुसरून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या चार महिलांना सन्मानित करण्यात येणार आहे.
टिळक रस्त्यावरील ज्योत्स्ना भोळे सभागृहात सायंकाळी ५.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी प्रेरणादायी कामगिरी केलेल्या या महिलांचा जीवनपट शुभांगी दामले मुलाखतीद्वारे उलगडणार आहेत. सन्मानित करण्यात येणाऱ्या महिलांमध्ये योग थेरपिस्ट डॉ. अनुराधा ओक, भिक्षेकऱ्यांसाठी काम करणाऱ्या डॉ. मनिषा सोनवणे, वृद्ध कल्याण शास्त्र तज्ज्ञ डॉ. रोहिणी पटवर्धन आणि कोरोना योद्धा डॉ. दीप्ती बच्छाव यांचा समावेश आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून अधिकाधिक नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.