महिला दिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिला दिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबीर
महिला दिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबीर

महिला दिनानिमित्त मोफत कर्करोग तपासणी शिबीर

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः जागतिक महिला दिनानिमित्त २५ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी शनिवार (ता. ५) पासून ११ मार्चपर्यंत सकाळी ११ ते ३ या वेळेत पुण्यातील जंगली महाराज रस्त्यावरील एलआरसीसी सेंटरमध्ये मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून स्तनांचा व गर्भाशयमुखाचा कर्करोग विकाराची मोफत स्क्रिनींग तपासणी करण्यात येईल. तसेच ४० वर्षांवरील अधिक महिलांची मोफत मॅमोग्राफी तपासणी करणार आहे.
सकाळ सोशल फाउंडेशन, आस्था सपोर्ट ग्रुपच्या वतीने व लोकमान्य हॉस्पिटल, निर्जारा फाउंडेशन आणि लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या सहकाऱ्याने हे शिबिर होत आहे. भारतात आज कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग हा एक स्तनाच्या ग्रंथींमध्ये तयार होणारा कर्करोग आहे. ४० टक्के स्तनाचे कर्करोग हे वय वर्षे ३५ ते ४५ मध्ये आढळतात. तसेच गर्भाशयाच्या मुखाला होणारा कॅन्सर हा गर्भाशय मुखाच्या पेशी जास्त वाढल्याने होतो. या पेशी आजूबाजूच्या अवयवांपर्यंत पोचू शकतात. सुरूवातीला या कॅन्सरची काहीच लक्षणे दिसत नाहीत. साधारणपणे ४० ते ५० वयाच्या दरम्यान या कर्करोगाचे प्रमाण जास्त आढळून येते. अशा विकारांचे वेळीच निदान करण्यासाठी महिलांनी वय २५ पासून ६५ वर्षांपर्यंत नियमित तपासणी करणे गरजेचे आहे. जागतिक महिला दिनानिमित्त जनजागृतीसाठी हे मोफत कर्करोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात येत असून जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे.
शिबिरात सहभागी होण्यासाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : ७७५७०६३६३९