पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचा समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचा समारोप
पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचा समारोप

पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचा समारोप

sakal_logo
By

पुणे, ता. १ ः पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रेचा आणि सद् भावना यात्रेचा समारोप मंगळवारी सायंकाळी ४ वाजता पुणे स्टेशनजवळील गांधी पुतळा येथे झाला.
महू (मध्य प्रदेश) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मभूमी स्मारकाचे व्यवस्थापन करणाऱ्या डॉ. आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने नवी स्मारक समिती स्थापन करून त्यांच्याकडे स्मारकाचे व्यवस्थापन सोपवल्याने ते वाचविण्यासाठी पुणे ते महू भीमज्योत मशाल यात्रा १५ फेब्रुवारीपासून काढण्यात आली होती. असलम इसाक बागवान​ यांनी यात्रेचे नेतृत्व केले. संयुक्त संविधान बचावो कृती समिती, भीम जन्मभूमी बचावो कृती समिती, इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपने या यात्रेचे आयोजन केले होते.
याप्रसंगी अब्दुल बागवान, सादिक पानसरे, इब्राहिम खान, विलास किरोते, संतोष म्हस्के, राजू सय्यद, सचिन आल्हाट, निखिल जाधव, साहिल मणियार, शानू पठाण, गफूर सय्यद, ऋषीकेश गायकवाड, रियाज बागवान व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. १२ ते १८ मार्चपर्यंत सद्भावना ग्रामपंचायत राज मजबूतीकरिता पोचमपल्ली (तेलंगणा) ते वर्धापर्यंत पदयात्रा इनक्रेडिबल समाजसेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान हे करणार आहेत.