Homeowner arrested for being responsible for four deaths
Homeowner arrested for being responsible for four deathssakal

चौघांच्या मृत्यूस जबाबदार असल्याने घरमालकास अटक

लोणी रेल्वे स्थानकाजवळील इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना, त्यामध्ये पडून बुधवारी चौघांचा मृत्यू

पुणे : लोणी रेल्वे स्थानकाजवळील इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करताना, त्यामध्ये पडून बुधवारी चौघांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, त्यास अटक केली.

भीमाजी जयसिंग काळभोर (वय ३८, रा. लोणी काळभोर) असे अटक केलेल्या घरमालकाचे नाव आहे. याप्रकरणी राजनंदिनी वाघमारे (रा. पठारे वस्ती, कदमवाकवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या घटनेत सिकंदर ऊर्फ दादा पोपट कसबे (वय ४५), पद्माकर मारुती वाघमारे (वय ४२), कृष्णा दत्ता जाधव (वय २६), रूपचंद ऊर्फ सुवर्ण नवनाथ कांबळे (वय ४५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पुणे-सोलापूर महामार्गालगत कदमवाकवस्ती येथील प्यासा हॉटेलच्या मागे भीमाजी जयसिंग काळभोर यांच्या मालकीची ‘जय मल्हार ग्रुप’ नावाची इमारत आहे. या इमारतीच्या शौचालयाची टाकी साफ करण्याचे काम रूपेश व सिकंदर यांनी घेतले होते. बुधवारी सकाळी त्यांनी कामाला सुरुवात केली. काम सुरू असतानाच चौघे जणांचा टाकीत पडून मृत्यू झाला होता.

दरम्यान, लोणी काळभोर पोलिसांनी संबंधित घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. घरमालक काळभोर याने कामगारांना दुर्गंधीयुक्त टाकीत उतरविले, त्यांच्या जीविताची कुठलीही काळजी न घेता त्यांना जबरदस्तीने गलिच्छ काम करण्यास भाग पाडले. संबंधित काम धोकादायक असून त्यासाठी आवश्‍यक ऑक्सि‍जन किंवा सुरक्षिततेची साधनेही त्यांना पुरविली नाहीत. टाकी साफ करण्याचे काम निष्णात व्यक्तींकडून करणे आवश्‍यक असतानाही, काळभोर याने त्याकडे दुर्लक्ष करून अन्य कामगारांना हे काम दिले. फिर्यादीचे पती पद्माकर वाघमारे यांचा काहीही संबंध नसतानाही त्यांनाही जबरदस्तीने काम करण्यास भाग पाडले. त्यामुळे चौघांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूस जबाबदार असल्याप्रकरणी पोलिसांनी काळभोर यास अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भागवत शेंडगे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com