
मराठी ही प्रवाही भाषा : डॉ. मेनकुदळे
पुणे, ता. ४ : मराठी भाषेला लोकसंस्कृती व लोकव्यवहाराचे कवच आहे, तोपर्यंत कोणताही धोका नाही. मराठी भाषा ही प्रवाही भाषा आहे. ती लोकव्यवहाराबरोबर साहित्य व्यवहारातही असावी, असे मत रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी व्यक्त केले.
एस. एम. जोशी कॉलेजमध्ये मराठी भाषा गौरव दिनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मराठी विभाग जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन व वैश्विक कला पर्यावरण पुणे यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. नेदरलॅंड येथील कवी व चित्रकार भास्कर हांडे, अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. अतुल चौरे यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. पुनम तडके यांनी केले. आभार प्रा. प्रांजली शहाणे यांनी मानले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..