मराठवाडा मित्रमंडळातर्फे एनएसएस शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मराठवाडा मित्रमंडळातर्फे 
एनएसएस शिबिर
मराठवाडा मित्रमंडळातर्फे एनएसएस शिबिर

मराठवाडा मित्रमंडळातर्फे एनएसएस शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यातील शिलिंब येथे पार पडलेल्या शिबिरात २५ विद्यार्थी-विद्यार्थिनी स्वयंसेवक व तीन शिक्षक सहभागी होते. या शिबिरामध्ये मंदिराची स्वच्छता, ओढ्यावर बंधारा बांधणे, मंदिराचे रंगकाम, पल्स पोलिओ अभियान, वृक्षारोपण आदी उपक्रम हाती घेण्यात आले. या शिबिरास मराठवाडा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिवाजी गणगे, कार्यकारी अध्यक्ष बी. जी. जाधव यांचे सहकार्य मिळाल्याचे कार्यक्रम अधिकारी प्रा. किर्ती सागांवकर यांनी सांगितले. प्राचार्य डॉ. उज्ज्वला पळसुळे यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. आयोजनात विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. शौनक नाईक आणि प्रा. योगेश कवडे यांचा सहभाग होता.
-
फोटो ः 47698

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top