
पावसाच्या पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन कामाला
सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २४ : नदीलगतच्या असलेल्या शहर व ग्रामीण भागांमध्ये पाणी शिरत असलेली ठिकाणे निश्चित करावाीत. त्या भागात राहणाऱ्या लोकांच्या स्थलांतराचा आराखडा तयार करण्यात यावा. त्याचबरोबर शहरी व ग्रामीण भागातील जुन्या इमारती अथवा वाडे यांचे बांधकाम तपासणी (स्ट्रकचरल ऑडिट) पावसाळ्यापूर्वी करून घेण्यात यावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना दिल्या आहेत. हवामान खात्याच्या अंदाजनुसार यंदाच्या वर्षी सरासरी एवढ्या पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मॉन्सूनपूर्व कोणती तयारी करायची, आपत्ती आल्यास नियोजन कसे करावे आदी सूचना दोन्ही महापालिकांना दिल्या आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना
- पावसाळ्यात दरडी कोसळणे, पूर येणे, एखादी इमारत कोसळणे आदी घटना घडतात
- हे विचारात घेऊन पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये नोडल ऑफिसरची नेमणूक करावी
- नदीपात्रामध्ये वाहने पार्किंग केली जातात. धरणातून पाणी सोडण्यात येते त्यावेळेस अथवा पावसाळ्यात अनेकदा नदीपात्र पूर्ण भरल्यानंतर नदीपात्रात पार्किंग केलेल्या गाड्या वाहून गेल्या आहेत. याबाबत पुणे महानगरपालिका यांनी दक्षता घ्यावी
- धोकादायक ठिकाणी संबंधित विभागाशी समन्वय करून प्रवेशास मनाई करावी
- सर्व महानगरपालिका, नगरपरिषद, छावणी मंडळ यांच्यामार्फत चालू असलेले कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी
- राडारोडा तत्काळ उचलण्यात यावा
- धोकादायक वृक्षांची छाटणी करावी
- महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या आपत्तीजन्य घटनांची माहिती जिल्हा नियंत्रण कक्षास द्यावी
- नदीपात्रालगत, पात्रातील झोपडपट्ट्या व इतर धोक्याच्या ठिकाणांचा अभ्यास करून योजना ठरवाव्यात
- नदीपात्रातील गाळ व जलपर्णी काढावी
- धोकादायक जागांचे सर्व्हेक्षण करावे
- गटार सफाई आणि औषध फवारणी करावी
- आणीबाणीच्या वेळी उपयोगात येणारी यंत्रे सुसज्ज ठेवावी
- नदी पात्रातील अतिक्रमणे काढावीत
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..