ंलैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ंलैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
ंलैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा

ंलैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. २४ : लग्नाचे आमिष दाखवून युवतीशी शारीरिक संबंध ठेवून त्याचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. गेली एक वर्षभर हा प्रकार सुरू होता. याबाबत २८ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. या याप्रकरणी अनिकेत ईश्वर भटेवरा (वय २६, रा. कल्याणीनगर) याच्याविरोधात येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार आरोपीच्या घरी आणि वेगवेगळ्या हॉटेलमध्ये घडला.
अनिकेत याने फिर्यादी युवतीला आंबे विकत देण्याच्या बहाण्याने घरी बोलावून घेतले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्याचे मोबाईलमध्ये शूटिंग करून तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिला हॉटेलमध्ये बोलावून लैंगिक अत्याचार केला.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top