अवती भवती

अवती भवती

Published on

जागतिक पुस्तक दिनी ग्रंथ प्रदर्शन
पुणे, ता. २४ : एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)मध्ये जागतिक पुस्तक दिवस उत्साहात साजरा केला. यानिमित्त ग्रंथ प्रदर्शन भरविण्यात आले होते. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, मुख्य मनुष्यबळ व्यवस्थापिका मनिषा खोमणे, ग्रंथपाल पवन शर्मा आदी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. मुंढे म्हणाले, की ‘‘पुस्तकांचे आयुष्यातील महत्त्व अनन्यसाधारण आहे. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी व्यक्तिमत्त्वाची जी योग्य घडण अपेक्षित असते. त्यासाठी पुस्तकांची मोलाची मदत होते. विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाशी संबंधित पुस्तकांव्यतिरिक्त अन्य विविध प्रकारची पुस्तके विशेषतः विविध क्षेत्रातील महान व्यक्तींची आत्मचरित्रे आवर्जून वाचायला हवीत, असे आवाहन त्यांनी केले.


महेश प्रोफेशनल फोरमचा पदग्रहण समारंभ उत्साहात
पुणे, ता. २४ : महेश प्रोफेशनल फोरम ईस्टचा पदग्रहण समारंभ सुझलॉन येथे संपन्न झाला. अध्यक्षपदी भारती बाहेती यांची निवड करण्यात आली. तसेच पुढील वर्षासाठी अतुल सिकची यांची निवड करण्यात आली. तसेच अन्य संचालकांनी ही पदभार सांभाळला. या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक सनातन धर्मदास प्रभू होते. या प्रसंगी बोलताना ते म्हणाले ‘‘जीवनात अथवा व्यवसायात आभार मानने हे महत्वाचे यशाचे सूत्र आहे. ईश्वर व आपल्या जीवनातील व्यक्तींच्या छोट्या मोठ्या कार्याबद्दल आभारी असले पाहिजे असे प्रतिपादन केले.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com