
डिझाईनगिरी पुस्तकाचे प्रकाशन
पुणे, ता. २४ : जागतिक दृष्टिकोनातून माध्यमे, मनोरंजन, अॅनिमेशन, डिझाईन क्षेत्राला पाहायला हवे. त्याकरिता डिझाईन व कल्पकता यामध्ये स्टोरी टेलिंग असणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे मत भारत सरकारच्या अॅनिमेशन डिझाईन टास्कफोर्सचे सल्लागार सदस्य आशिष कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
फर्ग्युसन कॉलेजच्या फिरोदिया सभागृहात आयोजित डिझाईनगिरी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचे कार्यकारी संचालक संतोष रासकर यांनी हे पुस्तक लिहिले आहे. कार्यक्रमाला माजी खासदार प्रदीप रावत, माजी महापौर मुरलीधर मोहोळ उपस्थित होते. कुलकर्णी म्हणाले,‘‘गुगल, नेटफिल्क्स हे आज प्रत्येक लहान मुलाचे आजी-आजोबा झाले आहेत. त्यामुळे त्यावर आपल्या स्टोरी असणे गरजचे आहे. स्टॉरी टेलिंग ही एक वेगळी इंडस्ट्री आहे. कल्पकता म्हणजे फक्त पेंटिंग, नृत्य इतके मर्यादित नाही. तर आपण काय दृष्टीने विचार करतो, त्याला कल्पकता आणि डिझाईनमध्ये महत्त्व आहे.’’ विद्याव्रत प्रकाशनच्या वतीने पुस्तकाचे प्रकाशन झाले.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..