
तिवारी दाम्पत्याविरोधात तक्रार अर्ज
पुणे, ता. २४ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याबद्दल खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रदेश महिला प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी कोरेगाव पोलिस ठाण्यामध्ये तक्रार अर्ज दिला आहे. तर चित्रपट निर्माते नीलेश नवलाखा आणि सामाजिक कार्यकर्ते संग्राम होनराव यांनी राणा दाम्पत्याविरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
ुमुख्यमंत्री ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबई आलेल्या खासदार राणा आणि त्यांचे पती यांना पोलिसांनी अटक केली. त्यावेळी त्यांनी ठाकरे यांच्या विरोधात अवमानकारक शब्द वापरले असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला आहे. त्यांच्या या वागण्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या दोघांवर त्वरित गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही तिवारी यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..