
''डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन न करणे खेदजनक''
पुणे, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे दौऱ्यात महानगरपालिकेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मेघडंबरीतील सिंहासनारूढ पुतळ्याचे अनावरण केले. परंतु महारपालिकेच्या परिसरात असलेल्या भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा देखील पुतळा आहे. परंतु या महामानवाच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यास पंतप्रधानांना वेळ मिळालेला नाही, हे खेदजनक बाब आहे, अशी टीका काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जगात नावलौकिक आहे. निवडणुकीच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेऊन दलित समाजाचे मत आपल्या पक्षाकडे घेण्याचे काम पंतप्रधान करतात. पंतप्रधानांबरोबर भारतीय जनता पक्षाचे, रिपब्लिकन पक्षाचे व इतर मागासवर्गीय नेते त्या कार्यक्रमास उपस्थित होते. त्यांनी देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, असा आरोप बागवे यांनी केला आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..